सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या ललित मोदी आणि सुष्मिता सेन या जोडी मधील कोण आहे जास्त श्रीमंत..

अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं ललित मोदी याच्याबरोबर असलेल्या नातेसंबंधांबाबत मौन सोडलं आहे. जेव्हा सुष्मिताच्या नवीन अफेअर सोशल मीडियावरून जगजाहीर झालं तेव्हा तिच्यावर कडाडून टीका झाली. सोशल मीडियावरील काही युझर्सनी तर तिला ‘गोल्ड डिगर’ (संधी साधू) असं म्हटलं आहे. तर काहींनी सुष्मिता केवळ पैशांसाठी डेट करत असल्याचं म्हणत तिच्यावर टीका केली आहे.

 

ललित मोदीनं त्या दोघांमधले अत्यंत रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर करत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. परंतु त्यावर सुष्मितानं अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता मात्र सुष्मितानं काही न बोलताही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुष्मितानं तिच्या बाजूनं असलेल्या काही कमेन्टला लाईक करत तिची बाजू मांडली आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध बिजनेस मॅन ललित मोदी आणि बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत असल्याचा बातम्या व्हायरल झाल्यापासून सोशल मीडिया माध्यमांवर या दोघांबाबतच सतत चर्चा करण्यात येत आहे. अशातच सुष्मिता सेन ला गोल्डीगर म्हणून नेटकऱ्यांकडून ट्रोल ही करण्यात येत आहे. याच परिस्थितीमुळे आज आपण या लेखाच्या माध्यमातून या दोघांच्याही नेटवर्थची माहिती जाणून घेऊया. जेणेकरून दोघांपैकी कोणाकडे सर्वात जास्त पैसा आहे हे समजू शकेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

ललित मोदी बद्दल बोलायचे झाले तर भारतातून फरारी घोषित झाल्यानंतर तो गेले अनेक वर्षे ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमध्ये राहत आहे. २०१० रोजी तो देश सोडून पळून गेला होता. यावेळी त्याच्यावर मनी लँडिंग केल्याचा खूप मोठा आरोप झाला होता. ललित मोदी हा खूप नावाजलेला उद्योगपती आहे. त्यांच्या कुटुंबाचा मोठा व्यवसाय देखील आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तो लंडनमधील एका अलिशान घरामध्ये राहत आहे. ७००० स्क्वेअर फुट मध्ये पसरलेल्या या घरात एकूण आठ बेडरूम आहेत. या आलिशान घरासाठी ललित मोदीला दर महिन्याला वीस लाख रुपये किंमत द्यावी लागते! यावेळी हे लक्षात घ्या की, भारताशिवाय जगभरातील इतर अनेक देशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरलेला असल्याने ललित मोदी आज कोट्यावधीमध्ये कमाई करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार ललित मोदींची एकूण मालमत्ता १२००० कोटीच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे याचबरोबर त्याच्याकडे जवळपास ४५०० कोटींची मालमत्ता देखील आहे!

आता बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याबद्दल बोलायचे झाल्यास तिच्या इन्कमचा एकमेव मार्ग म्हणजे बॉलीवूडची सिनेसृष्टी आहे! एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी इतके मानधन घेते आणि अशा प्रकारच्या सिनेमांमधून तिला एका वर्षाला सुमारे ९ कोटी रुपये मिळतात. त्यामुळेच सुष्मिता सेनकडेही जवळपास १०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. सुष्मिता मुंबईतील वर्सोवा येथे एका आलिशान अपार्टमेंट मध्ये राहते. याशिवाय सुष्मिता सेनकडे १ ऑडी, २ बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत.

Leave a Comment

Close Visit Np online