झी मराठीवरील या लोकप्रिय मालिका घेणार आता प्रेक्षकांचे निरोप आणि होणार नव्या ‘या’ मालिकांची एन्ट्री!!

झी मराठीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे चित्र समोर आले आहे. एकेकाळी मराठी मनोरंजन ‘झी मराठी’ या वाहिनीवरील मालिकांचा वेगळाच दबदबा असायचा, परंतु आता याच झी मराठीच्या टीआरपी मध्ये इतर वाहिन्यांच्या तुलनेत दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. काही केल्या मालिकांचा टीआरपी वाढतच नाही, त्यामुळे जुन्या मालिकांना निरोप देत झी मराठीवर आता लवकरच नवीन मालिका येताना पाहायला मिळणार आहेत. झी मराठीवर प्रसिद्ध असलेली मालिका ‘मन उडू उडू झालं’ ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी ‘तू चाल पुढे’ ही मालिका सुरू होणार आहे.

 

या मालिकेद्वारे मराठीतील दिग्गज अभिनेता अंकुश चौधरी याची बायको दीपा परब ही छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे. याचबरोबर अभिनेत्री धनश्री काडगावकर ही देखील मोठ्या ब्रेकनंतर झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ याच मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे!

दीपा परब आणि धनश्री काडगावकर यासोबत मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे, पण या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ही मालिका देखील झी वाहिनीवरुन एक्झिट होणार आहे. या ऐवजी ‘नवागडी नवे राज्य’ ही मालिका ८ ऑगस्ट पासून सुरू होताना दिसणार आहे. या मालिकेमधून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते केळकर या पुन्हा छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यादेखील ‘नवागडी नवा राज्य’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून त्या पहिल्यांदाच मालिका विश्वास त्या पदार्पण करणार आहेत!

याच सोबत ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम देखील खास स्त्री प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करणार असून हा कार्यक्रम २९ जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे दर आठवड्यात एक स्त्री सेलिब्रिटी या बस मधून स्त्री प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.

‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर’ हा कार्यक्रम देखील रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. संदीप पाठक यांचे सूत्रसंचालन करणार असून यात गश्मीर महाजन आणि सोनाली कुलकर्णी याचे परीक्षण करणार आहेत. आता या नव्या मालिका प्रेक्षकांवर कितपत भुरळ घालू शकतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे!

Leave a Comment

Close Visit uttamsheti