“महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधील कलाकारांचे हे आहेत रियल पार्टनर….समीर चौघुलेची बायको तर दिसते खूपच सुंदर….

मित्रहो मराठी विनोदी कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” दिवसेंदिवस भलतीच रंगात येत आहे. या शो ने अवघ्या महाराष्ट्राला प्रचंड वेड लावले आहे, यातील अनेक कलाकार उत्कृष्ट अभिनय करतात. धावपळीच्या जगात लोक इतके पळत आहेत की त्यांना हसणं देखील लक्षात राहत नाही. नेहमी चेहऱ्यावर गंभीर पणा खिळून ठेवलेला असतो, दरम्यान लोकांना रोज एक तास भर अगदी नियम लावल्यासारखे खळखळून हसवण्यासाठी हास्यजत्रेचे हे कलाकार पडद्यावर झळकत असतात. त्यांच्यातील ही कला अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते. बघता बघता हे कलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत.

 

या कलाकारांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात, त्यांचे पडद्यावर असणारे जोडीदार तर आपणाला माहीतच आहे पण असे हे अलंकार कोणावर प्रेम करतात व त्यांच्या खऱ्या आयुष्यात साथीदार कोण आहेत हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

१) विशाखा सुभेदार :- विशाखा ही अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आहे, तिच्या अनेक भूमिका भरपूर गाजल्या आहेत. तिने येड्यांची जत्रा, फक्त लढ म्हण, मस्त चाललंय आमचं, गुलदस्ता,झपाटलेला २, बालक पालक, गोंदया मारतय तंगड यांसारख्या अनेक चित्रपटात तिने विशेष अभिनय केला आहे. फु बाई फु, महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेटट्रेन यांसारख्या खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमात तिने उत्कृष्ट काम केले आहे. समीर चौगुले सोबत तिची जोडी पडद्यावर प्रचंड गाजली आहे, मात्र खऱ्या आयुष्यात विशाखा च्या पतीचे नाव महेश सुभेदार असून ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.

२) समीर चौघुले :- समीरने बघता बघता विनोदावरची आपली पकड मजबूत केली आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून त्याने आजवर संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड हसवले आहे. आजवर त्याने मुंबई मेरी जान, आजचा दिवस माझा, अ पेइंग घोस्ट, यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या तो “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या सोनी मराठी वरील गाजलेल्या कार्यक्रमात काम करत आहे. यातील त्याच्या अतरंगी भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. विशाखा सोबतची त्याची जोडी महाराष्ट्राला खूप आवडते, खऱ्या आयुष्यात मात्र त्याची जोडी कविता चौघुले हिच्याशी जोडली गेली आहे.

३)नम्रता संभेराव :- महाराष्ट्राची थप्पड गर्ल, नम्रता प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या अतरंगी भूमिका आणि विनोदातील खास वेडेपणा रसिकांना खळखळून हसवतो. तिच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. मित्रहो नम्रता प्रत्येक कलाकारांसोबत सहज एकजीव होते, व प्रत्येक भूमिकेत सहज समरस होते. त्यामुळे तिच्या कुशाग्र बुद्धीला प्रेक्षकांचा नेहमी सलाम असतो. १३ मे २०१४ रोजी तिने योगेश संभेराव याच्याशी आपली लग्नगाठ बांधली आहे.

४) अरुण कदम :- अरुण यांच्या निराळ्या मराठी बोलीने मंच प्रत्येक वेळी खुलून येतो, अनेक भूमिकेत आजवर त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राचा कोपरा, कोपरा त्यांच्या विनोदी अभिनयाने खळखळून हसतो. मित्रहो अरुण कदम यांनी कादंबरी कदम हिच्याशी लग्न केलं आहे,टेलिव्हिजन मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. त्यांची जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्यामुळे अनेक नेटकरी त्यांच्या जोडीला नेहमीच खूप पसंत करतात.

तर मित्रहो यांसारखे अनेक कलाकार या हास्यजत्रा मध्ये लोकप्रिय आहेत. त्यांची ही लोकप्रियता अशीच राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti