९० च्या दशकातील बॉलीवूड सम्राज्ञी जयाप्रदा यांचा लुक पाहिलात का? चाहत्यांना आवडतोय त्यांचा हा अनोखा अंदाज!

 

 

बॉलीवूडच्या ८०-९० च्या काळात चमचमत्या चंदेरी दुनियेत राज्य करणाऱ्या अनेक सौंदर्यवती अभिनेत्री होऊन गेल्यात. रेखा, श्रीदेवी, हेमा मालिनी, जयाप्रदा, झीनत अमान, परविन बाबी या अभिनेत्रींनापैकी काही तर सुपरस्टार बनल्या आणि अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत राहिल्या!

यातीलच एक सीने रसिकांच्या आवडीची बॉलीवूडमधील सौंदर्यवती म्हणजे जयाप्रदा! ९० च्या दशकामध्ये एक फेज होती जेव्हा जयाप्रदा यांच्या दिसण्याचे, त्यांच्या नृत्याचे, अभिनयाचे सगळेच फॅन होते आणि लाखोंच्या घरात त्यांनी चाहते ही मिळवले होते! तसं पाहायला गेलं तर आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये जयाप्रदा यांनी आजवर अनेक चित्रपट केले आहेत. बॉलिवूडच्या या जगतात कित्येक सुपरहिट सिनेमे त्यांच्या नावावर जमा आहेत!
घर घर की कहानी, तुफान, सरगम, माँ, संजोग, मुद्दत, सिंदूर, जबरदस्त, गंगा तेरे देश मे, कामचोर, आवाज, सपनो का मंदिर, पाताल भैरवी, जख्मी या सर्व चित्रपटांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. जयाप्रदा यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि निरागस सौंदर्याने सर्व रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्यात यश मिळवलेले!

जयाप्रदा सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असलेल्या दिसतात. आपल्या वेगवेगळ्या लुक मधील फोटो त्या कायमच पोस्ट करत राहतात. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यात त्या एकदम वेगळ्या लुक मध्ये दिसत आहेत!

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

त्यांच्या सोशल मीडियाच्या इन्स्टा हँडल वरून जयाप्रदा बराच ऍक्टिव्ह असतात. या अकाउंट वरून त्या स्वतःचे वेगवेगळे फोटो अपलोड करत असतात. यावर त्यांनी कधी साडीवरचा फोटो अपलोड केलाय, तर कधी गाऊन घातलेला भन्नाट फोटो, तर काही वेळेस एखादा रियालिटी शो दरम्यान चा फोटो अपलोड केला आहे. जयाप्रदा यांचे हे फोटोज सध्या खूप चर्चेत आलेले दिसतात.

त्यांच्या फोटोवर आणि त्यांच्या लुक वर चाहत्यांकडून जोरदार कमेंट देखील येऊ लागल्या आहेत आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांचा हा वेगळा अंदाज खूपच आवडत असल्याचे चित्र समोर येत आहे. या वयातही जयाप्रदा यांनी त्यांचे सौंदर्य कसं टिकून ठेवलंय? याच गोष्टीचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे! ९० च्या दशका पासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचे चाहते अजूनही आहेत एवढं मात्र नक्की!

Leave a Comment

Close Visit Np online