..आणि दिलीप प्रभावळकर यांना कोणी ओळखूच शकले नाही! अगदी संजय दत्त कडूनही झाली चूक!

मराठी सिनेसृष्टी मधील एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे अभिनेता दिलीप प्रभावळकर! आजही अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये दिलीप प्रभावळकर यांचे नाव प्रथम स्थानी घेण्यात येतं. चित्रपट असो किंवा नाटक, अगदी मालिका जरी असली तरी प्रत्येक क्षेत्रात प्रभावळकर यांनी आज स्वतःचा एक वेगळा ठसा उठवला आहे. केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर लेखनातही प्रभावळकर यांनी स्वतःच एक अढळ स्थान निर्माण करण्यात यश मिळवल आहे! नुकतंच दिलीप प्रभावळकर यांनी ७७ व्या वर्षात पदार्पण केलंय.

 

आज दिलीप प्रभावळकर यांनी फक्त मराठीसृष्टीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमामध्ये ‘महात्मा गांधी’ यांची भूमिका साकार केली होती आणि त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या भूमिकेसाठी सिने रसिकांकडून त्यांच विशेष कौतुक देखील करण्यात आलं होतं.

लगे रहो मुन्नाभाई या सिनेमाच्या चित्रीकरणाला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी दिलीप प्रभावळकर त्या सेटवर लवकरच जायचे आणि महात्मा गांधींसाठी चा मेकअप करत सेटवर हजर राहायचे. या सिनेमामध्ये त्यांच्या सोबत संजय दत्त मुख्य भूमिका साकारत झळकला होता. त्यावेळी शूटिंग दरम्यान संजय दत्त कायमच दिलीप प्रभावळकर यांना गांधीजींच्या भूमिकेत पाहायचा, पण एक दिवस असं झालं की प्रभावळकर गांधीजींच्या मेकअप मध्ये नव्हते त्यावेळी संजय दत्त सेटवर आला आणि तो अनोळखी नजरेने प्रभावळकरांकडे पाहू लागला आणि नंतर तो त्यांना खूपच निरखून पाहू लागला, मग त्याच्या हे लक्षात आलं की हे तर दिलीप प्रभावळकर आहेत! गांधीजींच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर इतके समरसून गेले होते म्हणून संजय दत्त देखील त्यांना ओळखू शकला नाही!

दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलेल आहे. प्रभावळकर यांनी ‘हसवा फसवी’ नाटकात एक नाही तर सहा भूमिका साकारल्या. प्रभावळकरांनी साकार केलेला चिमणराव आजही अनेक प्रेक्षकांच्या मनावर अढळ स्थान घेऊन बसला आहे, इतकी ती भूमिका गाजली होती!

दिलीप प्रभावळकर यांनी आजपर्यंत सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये किंवा नाटकांमध्ये ज्या ज्या भूमिका निभावल्या त्याची चर्चा तर झालीच आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात सुद्धा त्यांनी जागा पटकावली! त्यातील चौकट राजा मधील ‘नंदू’, झपाटलेला मधील ‘तात्या विंचू’, गंगाधर टिपरे मधील ‘आबा’ आणि अलीकडीलच पछाडलेला सिनेमातील ‘इनामदार भुसनळे’ या व्यक्तिरेखा त्यांच्या विशेष संस्मरणीय ठरल्या आहेत!

Leave a Comment

Close Visit uttamsheti