मिस्टर परफेक्ट असलेल्या आमिर खानच्या मुलीचे बॉयफ्रेंड सोबतचे रोमँटिक फोटो होत आहेत व्हायरल!! आमिरच्या घरी होणार यंदा कर्तव्य!!

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. ते खासगी तसंच व्यावसायिक जीवनातील गोष्टी, विशेष अनुभव आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतात. अनेक सेलेब्रिटी तर त्यांच्या खास पोस्टमुळे सातत्याने चर्चेत असतात. सेलेब्रिटी किड्स ही यात मागे नाहीत. सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची मुलगी इरा खान सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत. आयरा खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांची नावे बर्‍याच काळापासून मीडियावर चर्चेत राहिली होती. यावेळी आयराने नुपूर सोबत आपली आजी झीनत हुसेन यांच्या भेटीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला आहे. आयराच्या या फोटोमुळे ती लवकरच नुपूर सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चेला पेव फुटलं आहे!

 

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट करत “लग्न करणार आहेस का?” असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.

अहिरा तिच्या सोशल मीडिया हँडलवर कायमच ऍक्टिव्ह असलेली दिसते इन्स्टाग्रामवर तर तिचे ६२००० पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यावरच ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर सोबतचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

गेल्या दोन वर्षांपासून आयरा आणि नुपूर रिलेशनशिप मध्ये असल्याचे समजते. गेल्याच वर्षी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कबुलही दिली होती! नुपूर शिखरे हा व्यवसायाने एक फिटनेस ट्रेनर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी आयराने फिटनेस कडे विशेष लक्ष दिलं होतं, त्यावेळी नुपूर शिखरे तिचा फिटनेस ट्रेनर होता!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

काही दिवसांपूर्वी आयराच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यावेळी आयराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत होता. हे दोघं त्यांचे फोटोज्, व्हिडीओज् नेहमीच शेअर करत असतात. आता देखील या दोघांचा एक जुना फोटो जोरदार चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे यात या दोघांसह आमिरही आहे, त्यामुळे नुपूर आणि आमिरमधील बाँडिंग कसं आहे याविषयी चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वी नुपूर आणि आयरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

Leave a Comment

Close Visit Np online