इन्स्टा लाईव्ह करताना रणबीर कपूरने केली आलियाची ‘अशी’ फजिती! निळ्या ड्रेस मध्ये बेबी बंप लपवताना दिसली आलिया..
बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेतील एक क्युट कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर! आलिया आणि रणबीर ची लव स्टोरी या बॉलिवूडच्या दुनियेत प्रचंड हिट झाली! त्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकत आपल्या चाहत्यांना गोड धक्का ही दिला होता! त्यानंतर लगेचच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भटने गुड न्यूज देखील दिली आहे! आलिया आपल्या सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असलेली दिसते. सध्या एका लाईव्ह सेशनच्या व्हिडिओमध्ये तिचा पती रणवीरने तिची चांगलेच फजिती केल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनीही जोरदार कॉमेंट करत प्रतिसाद दिला आहे. नेमका आहे तरी काय या व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊ!
ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक आयान मुखर्जी सोबत आलिया इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन करत असताना रणबीर कपूर देखील लाईव्ह सेशनमध्ये आला. रणबीर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जास्त सक्रिय ऍक्टिव्ह नसतो, यावेळी आलिया अयान सोबत गप्पा मारत असताना रणबीरही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला. त्यांच्या चित्रपटातील ‘केसरीया’ गाण्याच्या रिलीज बद्दल गप्पा मारण्यासाठी हे तिघे एकत्र आले होते. या चॅट दरम्यान रणबीरने त्याच्या बायकोचे कौतुकही केले! या लाईव्ह सेशन दरम्यान आलिया तिच्या घरी बसली होती, यावेळी रणबीरने तिला केसरिया च्या रिलीज बद्दल विचारले आणि आयान सोबत काम करण्याचा अनुभव देखील विचारला.
यानंतर आलियाने देखील रणबीरला अयान सोबत त्याचा काम करण्याचा अनुभव शेअर करण्यासाठी सांगितलं. यावेळी रणबीर म्हणाला की,
‘ मला आठवतं की जेव्हा मी हायवे पाहिला तेव्हा मी अयानच्या घरी आलो तिथे फक्त अयान आणि करण उपस्थित होते आणि त्याला म्हणाले ये तो अमिताभ बच्चन निकली!” हा त्याचा दुसरा चित्रपट आहे माझं भविष्यवाणी खरी ठरली!
View this post on Instagram
या लाईव्ह मध्ये प्रेग्नेंट असलेली आलिया निळ्या रंगाच्या सिम्पल ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप लपवताना दिसली! ‘केसरीया तेरा’ हे अतिशय सुंदर गाणं अरजीत सिंगने गायल असून अमिताभ भट्टाचार्य यांनी ते लिहिले आहे. तर या गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिल आहे. ब्रह्मास्त्र हा आलीया आणि रणबीरचा एकत्रित असलेला पहिला चित्रपट असणार आहे. यात त्यांच्यासमवेत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका यात आहेत. येत्या ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.