वंदना गुप्ते यांचा हा फोटो होतोय खूप व्हायरल..शेजारी बसलेल्या छोट्या मुलाला ओळखले का?.. आता झालाय मोठा…

मित्रहो फोटो हा नेहमीच आपल्या आठवणी जपून ठेवतो, यातून आपण आपले जुने दिवस, जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहु शकतो व त्यामुळे आठवणींना उजाळा मिळत राहतो. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी देखील सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे, हा फोटो अनेक नेटकऱ्यांची फिरकी घेत आहे. हा फोटो “ज्याचा त्याचा प्रश्न” या नाटकातील आहे. या फोटो मध्ये त्यांच्या शेजारी एक छोटा, बालकलाकार दिसत आहे. दोघेही आपापल्या भूमिकेत दंग असलेले दिसून येते. मित्रहो हा बालकलाकार आता हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील मोठा दिग्दर्शक आहे.

 

त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, “बच्चा होता आणि आता मोठा दिग्दर्शक झाला आहे” असे कॅप्शन देऊन वंदना यांनी हा फोटो शेअर केला आहे. फोटोतील हा लहानगा मुलगा दुसरा कोणी नसून सूप6दिग्दर्शक ओम राऊत आहे. ओम राऊतने २०१२ साली “मीना राऊत फिल्म्स” या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. याआधी त्याने “लोकमान्य एक युगपुरुष” या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट मराठी रंगभूमीवर विशेष गाजला आहे. चित्रपटाची कथा, आणि यातील कलाकार खूप गाजले आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून ओमने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले, पुढे त्याने “तानाजी” या हिंदी चित्रपट सृष्टीतील चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट देखील पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाला अनेक प्रेक्षकांची पसंरी मिळाली आहे. तसेच त्याचा आगामी चित्रपट “आदीपुरुष” या भव्य दिव्य चित्रपटाकडे अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून आहे. हा चित्रपट देखील लवकरच भेटीस येणार आहे. दिग्दर्शक उत्तम असेल तर सगळ्याच गोष्टी उत्तम घडून येतात, त्यामुळे कसलीच त्रुटी उरत नाही.

सोशल मीडियावर ओमचा लहानपणीचा फोटो खूप चर्चेत येत आहे, अनेक नेटकरी या फोटोमध्ये कोण असावा असा अंदाज लावत आहेत. तसेच वंदना यांनी खाली लिहलेल्या ओळीतून हिंट मिळाली असून ओम नव्याने चर्चेत आला आहे. नाटकात लहानपण साकारत अभिनय करताना कदाचित त्यावेळी कोणाला वाटले नसेल की एकदिवस हा लहान ओम इतका मोठा दिग्दर्शक बनेल. पण आपल्या कलेच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्याने आपले करिअर उत्तम घडवले आहे.

आजवर ओम राऊतचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, प्रत्येक चित्रपटात एक खास पणा असतो त्यामुळे हे चित्रपट आवर्जून रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. त्याला नेहमी असेच यश मिळत राहो ही सदिच्छा. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti