‘मन उडू उडू झालं’ झालं मालिकेतील या अभिनेत्रीचा पती आहे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक..
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झाल या मालिकेचे शूटिंग नुकतेच संपले असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आजच्या या लेखात आपण मुक्ताची भूमिका साकारण्यात असलेल्या अभिनेत्री बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ‘मन उडू उडू झालं’ या सिरीयल मधील अभिनेत्री प्राजक्ता परब हिने पंचतारांकित हॉटेलमध्ये करत असलेली मोठ्या पगाराची नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात येण्याची धाडस दाखवले. अभिनेत्री प्राजक्ता परब सध्या झी मराठी वाहिनीवरील म्हणून ‘मन उडू उडू झाल’ या सिरीयल मध्ये मुक्ताची म्हणजेच इंद्राच्या बहिणीची भूमिका निभावत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना सर्व भारतीय खेळाडूंची जबाबदारी तीच पाहत होती, परंतु असे असताना देखील प्राजक्ताला अभिनय करण्याचे वेड लागले!
या कलाविश्वात येण्यासाठी तिने तिच्या घरच्यांकडून थोडा वेळ मागून घेतलेला आणि या सुरुवातीच्या काळात प्राजक्ताने हळूहळू जाहिरात विश्वात आपला जम बसवण्यासाठी सुरुवात केली. तिने अगदी कार्तिक आर्यन सोबत देखील एंगेज डिओची ऍड केलेली! सेंटर फ्रेश, महाराष्ट्र शासनाची वेस्ट नो मोअर, विक फिल्ड डेझर्ट, जिओ मार्ट अशा लोकप्रिय जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळाली.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करत असताना नाना पाटेकर, रजनीकांत यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत तिची चांगलीच ओळख निर्माण झालेली, मात्र तरीही तिने स्वतःच्या बळावर कला विश्वात येण्याचे धाडस दाखवले!
View this post on Instagram
वेगवेगळ्या व्यावसायिक जाहिरातीमुळे प्राजक्ताला लोकप्रियता मिळत गेली. यातूनच पुढे ललित २०५, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिका आणि माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेब सिरीज मध्ये प्राजक्ताला महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकण्याची चांगली संधी मिळाली!
View this post on Instagram
या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ९ जानेवारी २०२१ रोजी प्राजक्ता परबने मराठीतील दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या अंकुश मोरोडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली! झी मराठीवरील ‘ती परत आली आहे’ या मालिकेचे दिग्दर्शन अंकुश मरोडे पाहत आहेत. परंतु आता लवकरच ही सिरीयल प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अंकुशने आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली आहे. अंकुशने सुरुवातीला याच्या आधी हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे. असिस्टंट डायरेक्टरची भूमिका साकारत असताना त्यांनी ‘सड्डा हक्क’ ‘लाल इश्क’ ‘ऐसी दिवानगी देखी नही कही’ या हिंदी मालिकांसाठी काम केले आहे. ७ वर्षे हिंदी काळविश्वात काम केल्यानंतर ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतून त्यांनी मराठी कला विश्वात पाऊल टाकलं!