झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप! वाचून वाटेल आश्चर्य!

सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. सिझन २ चा प्रोमो पाहून असे वाटले होते की याचा टीआरपी मजबूत वाढेल परंतु मालिकेच्या सुरुवातीला काही भागांना अपयश मिळाले! पण पुढे जसे कथानक सरकत गेले तसे या सिरीयलचा टीआरपी मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने देखील पहिल्या सीजन इतकीच प्रसिद्धी नक्कीच मिळवली आहे! सध्या या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स येत असलेले पाहायला मिळत आहे.

 

या सिरीयल मध्ये आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे, इन्स्पेक्टर जामकरच्या या भूमिकेने नुसता धुमाकूळ घातलाय! यामुळे मालिकेला टीआरपी सह एक वेगळाच मसाला मिळाला आहे. परंतु आता या सिरीयल संबंधित एक धक्कादायक वेगळीच बातमी समोर येत आहे, ती म्हणजे की ही सिरीयल आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. परंतु अद्यापही अशी कोणतीच अधिकृत घोषणा चॅनलकडून करण्यात आलेली नाही. परंतु मालिका विश्वात मात्र याची चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by देवमाणूस २ (@devmanus_2_official)

सध्या सिरीयल मध्ये सुरू असलेल्या कथानकानुसार ही सिरीयल लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी चर्चा रंगली आहे. एवढेच नाही तर हा शेवट या मालिकेचा शेवटचा भाग नसून लवकरच याचा तिसरा भाग देखील येणार आहे, असे म्हणण्यात येत आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या पर्वापासूनच डॉक्टर अजित म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड लोकांच्या मनावर राज्य करत आहे. याच्या पहिल्या सीजनमध्ये डॉक्टर अजित कुमार तर दुसऱ्या पर्वात तो नटवर सिंग ही भूमिका साकारताना दिसला. या भागात डॉक्टर अजितचा डाव संपवण्यासाठी त्याच्यापेक्षाही वरचढ आणि हुशार माणूस हवा होता आणि आता अखेर मालिकेत त्याची एंट्री झाली आहे.

या सिरीयल मध्ये मार्तंड जामकर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे निभावत असून यात ते डॉक्टरवर देखील भारी पडताना दिसत आहे. मार्तंड जामकरने घेतलेल्या एन्ट्रीमुळे या सिरीयलचा टीआरपी झपाट्याने वाढला आहे आणि कथानकाने देखील वेग पकडला आहे. यामुळेच ही मालिका आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळी देखील तो सही सलामत बाहेर निसटणार? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मालिकेचा शेवट किंवा नव्या पर्वाची सुरुवात!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही सिरीयल संपणार असल्यामागे आणखी एक कारण देण्यात येत आहे, ते म्हणजे या जागी होणाऱ्या नवा मालिकेचे आगमन! ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नावाच्या सिरीयलचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. त्यामुळे देव माणूस संपल्यावर त्या जागी ही मालिका सुरू होणार अशी चर्चा रंगली आहे.

Leave a Comment

Close Visit Np online