मुंबई इंडियन संघामध्ये ट्रेनर आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधील ‘या’ अभिनेत्रीचा नवरा!

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे. या सिरीयल मधील नेहा आणि यश यांच्या जोडीप्रमाणेच शेफाली आणि समीर यांचीही जोडी रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

 

मालिकेमध्ये नेहाची मैत्रिण शेफाली हीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री काजल काटे हिने अगदी कमी काळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेमध्ये आता समीर आणि शेफालीचे सूर हळूहळू जुळू लागल्याने लवकरच दोघे आता लग्न बंधनात अडकणार अशी चिन्ह दिसत आहेत!

परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? रील लाईफ मध्ये समीरच्या मागे असलेली शेफाली म्हणजेच काजलने रियल लाईफ मध्ये मात्र केव्हाच स्वतःच लग्न उरकल आहे!

काजलने दोन वर्षांपूर्वी प्रतीक कदम याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली. काजलच्या नवऱ्याची म्हणजेच प्रतीकचे मुंबई इंडियन टीम सोबत वेगळेच नातं आहे. ते म्हणजे मुंबई इंडियन्स आयपीएल संघामध्ये प्रतीक ट्रेनर म्हणून काम करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

प्रतीक आणि काजल आपापल्या सोशल मीडियावरती बरेच एक्टिव असून कायमच तिकडे ते एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करत राहतात. गणेश उत्सवाचे औचित्य साधन या दोघांनीही आपल्या घरी गणपतीचे जल्लोष स्वागत केल आहे. यावेळी गणराया सोबत दोघांचा अतिशय सुंदर असा फोटो काजलने पोस्ट केला आहे!

सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका खूप गाजते आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ‘शेफाली’.

नेहाची कलीग आणि जवळची मैत्रीण शेफाली हिची भूमिका अभिनेत्री काजल काटे अगदी चोख बजावतेय.

मीडियाला देण्यात आलेल्या एका इंटरव्यू दरम्यान
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना काजल म्हणाली, ‘शेफाली ही माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी काहीशी अल्लड अशी मी सुद्धा आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येते. शेफाली म्हंटल की माझ्या डोळ्यासमोर आले ते कभी ख़ुशी कभी गम चित्रपटातील काजोल आणि जब वी मेट मधली करीना कपूर. या दोघींचं मिश्रण म्हणजे शेफाली. शेफाली हे खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे सेटवरही मला सतत एनर्जेटिक राहावं लागतं.’

नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात काजल हीचा सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखेसाठी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. काजल हे तिचं मोठं यश मानते. मात्र काजलला मिळालेलं हे पाहायला तिचे आई- वडील हयात नाहीत. एका पोस्टमधून काजलने ही खंत बोलून दाखवली आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti