गणेशउत्सवामध्ये श्रद्धा कपूरने केला खास मराठमोळा लुक..

सध्या सगळीकडे गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. बॉलिवूडचे व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धाने बॉलिवूडमध्ये गेल्या ११ वर्षांत अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आणि स्वत:च स्थान निर्माण केलंय. बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची भाची असलेली श्रद्धा कपूर हीच्या घरीही गणरायाचे आगमन झालेले आहे. आपल्या सोशल मीडिया हँडल वरून श्रद्धा कपूरने त्यांच्या घरातील गणपती बाप्पाचे फोटो पोस्ट केलेले आहेत.

 

या गणेश उत्सवाचे खास औचित्य साधत श्रद्धाने यावेळी देखील पारंपारिक मराठमोळा लूक केला असून, नाकात रिंग आणि खणाची साडी देखील परिधान केलेली आहे. या लुक मध्ये श्रद्धा खूपच जास्त क्युट दिसत आहे.
श्रद्धाने तिच्या सोशल मीडिया वरती या फोटोंचा कोलाज करून शेअर केले असून, यातील एका फोटोमध्ये ती गणपती बाप्पा सोबतचा तसेच मोदकासोबतही फोटो तिने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धालाही गणपती बाप्पाचा लाडका प्रसाद म्हणजे मोदक हे खूपच जास्त आवडत असून तिने मोदक खातानाचा फोटो शेअर केला आहे. ‘मोदकाशिवाय गणेश उत्सव अपूर्णच राहतो’ असे श्रद्धा म्हणते.

श्रद्धा आपल्या सोशल मीडिया वरती कायमच वेगवेगळ्या वेषातील फोटो शेअर करत राहते. त्यातील पाश्चिमात्य लूकप्रमानेच विशेष करून ती मराठमोळ्या वेशभूषेमध्ये खूपच सुंदर दिसते.

खरं तर, श्रद्धा कपूरची आई ही महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळेच तिच्यात मराठीचा गोडवा आहे. श्रद्धा उत्तम मराठीसुद्धा बोळण्यासोबतच महाराष्ट्रातील सगळे सनसमारंभ ही उत्साहात साजरे करताना दिसते.

यावेळी ठाण्यामध्ये झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला देखील श्रद्धा हजर राहिली होती. तेव्हा तिने उपस्थित असलेल्या गोविंदांसोबत मराठी मध्ये संवाद साधला होता!

गणेशोत्सवाचे हे फोटो शेअर करताना,
गणेशोत्सव हा आपला आवडता सण असल्याचे श्रद्धा म्हणाली आहे. तसेच ‘गणेश उत्सवाचे हे दहा दिवस तिचे वर्षातील सगळ्यात आवडते दहा दिवस असल्याचे’ कॅप्शन तिने या फोटो सोबत शेअर केले आहे. श्रद्धा कपूरचा हा मराठमोळा अंदाज तिच्या फॅन्सला प्रचंड आवडला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत ते तिच्या फोटोवर भरभरून प्रतिसाद देत आहे!

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पडद्यावर जितकी मॉडर्न आणि स्टायलिश असते. खऱ्या आयुष्यात ती तितकीच सोज्वळ आणि साधी आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने रसिकांच्या मनावर राज्य केलंय.

Leave a Comment

Close Visit uttamsheti