आलिया भट नंतर आता लावलाय कॅटरिना कैफने नंबर! लवकरच बनणार आहे आई..
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कैटरीना कैफ लग्न झाल्यापासून लाईन लाईट पासून दूर झालेली दिसत आहे. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत कॅटरिनाला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र ती कुठेही फारशी दिसलेली नाही. एवढेच काय तर ती तिच्या सोशल मीडिया हँडल वरून देखील चाहत्यांसाठी स्वतःबद्दल काही पोस्ट करत नाहीये! यावरूनच कॅटरिना बद्दल सोशल मीडियावर असलेले तिचे चाहते वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे कॅटरिना आता लवकरच आई होण्याच्या मार्गावर आहे!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका न्यूज पोर्टलने कॅटरिनाच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्या संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते की, कॅटरिना कैफ लाईन लाईट पासून दूर का झाली असेल? यावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावत वेगवेगळी उत्तरे देखील दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना कॅटरिनाच्या अनेक चाहत्यांपैकी एक चाहता म्हणाला की, “कॅटरिना कैफ आता आई होणार आहे”
तर दुसऱ्या एका फॅनने प्रतिक्रिया दिली की,
“कदाचित ती गर्भवती आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे!” तर अजून एका चाहत्याने उत्तर दिले की, “कैटरीना सध्या प्रेग्नेंट आहे आणि लवकरच ती तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करणार आहे!”
कॅटरिना कैफचे सोशल मीडिया अकाउंट वरून नजर फिरवली असता, २८ जून रोजी कॅटरिनानी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. यावेळी कॅटरिनाने तिच्या आगामी काळात येणाऱ्या ‘फोन भूत’ या सिनेमाचे पोस्टर पोस्ट मधून शेअर केले होते। यानंतर मात्र कॅटरिनाची एकही पोस्ट दिसत नाहीये. त्याचबरोबर करण जोहरच्या बर्थडे पार्टी दरम्यानचा तिचा शेवटचा फोटोही कॅटरिनानी तिच्या
वॉलवर शेअर केला आहे.
सध्या कॅटरिना कैफच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास तिच्याकडे ‘फोन भूत’ ‘टायगर 3’ ‘ जीले जरा’ ‘मेरी ख्रिसमस’ यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत! यातील टायगर 3 मध्ये ती पुन्हा एकदा सलमान खान सोबत झळकणार असून, यात ती त्याच्या बरोबरीने जबरदस्त ॲक्शन करताना तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे!