धक्कादायक ! “सुख म्हणजे नक्की काय” मधील या कलाकाराचे झाले दुःखद निधन..

मित्रहो “सुख म्हणजे नक्की काय” ही मालिका व यातील कलाकार घराघरात पोहचले आहेत, मालिकेचे कथानक दिवसेंदिवस लोकप्रिय बनत चालले आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने आपला टॉप गिअर चांगलाच जपून ठेवला आहे आणि म्हणून तर आज सोशल मीडियावर सुद्धा ही मालिका टॉप मध्ये चर्चेत असते. पण मित्रहो आज या मालिलेतील एक अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. ही दुःखद बातमी सर्वत्र पसरली असून चाहते मंडळी खूप उदास झाली आहेत. हे सुप्रसिद्ध अभिनेते अरविंद धनु यांचे धक्कादायक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

अरविंद हे अवघ्या सत्तेचाळीस वर्षाचे होते, उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना अटॅक आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. सर्व नातेवाईक देखील त्यांच्या अशा जाण्याने फार दुःखी झाले आहेत, एक कलाकार म्हणून त्यांनी पडद्यावर नेहमीच उत्तम कामगिरी बजावली आहे. अनेक लोक त्यांच्या भूमिका मन एकाग्र करून पाहायचे, कलाकार या नात्याने त्यांनी नेहमी आपल्या भूमिकेत इतका जिवंत पणा राखला आहे की या भूमिकेतून ते अनेकांच्या मनात जगत राहतील.

“लेक माझी लाडकी”, “सुख म्हणजे नक्की काय असत”, “क्राईम पेट्रोल” यांसारख्या मराठी मालिकेतून ते पडद्यावर झळकले आहेत. यामध्ये त्यांनी विविधांगी भूमिका निभावल्या आहेत, या भूमिकांचे रसिकांच्या चर्चेत नेहमीच भरभरून कौतुक करण्यात आले आहे. अलीकडे ते “सुख म्हणजे नक्की काय असत” या मालिकेत काम करत होते, ही मालिका बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या विशेष भूमिकेमुळे घराघरात पोहचला आहे. मालिकेचा प्रत्येक भाग जणू आपल्याच घरातील आहे असं वाटत असते.

त्यामुळे हे कलाकार सुद्धा घरचेच सदस्य आहे अस वाटते. म्हणून तर त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी देखील चाहत्यांना आपल्याशा वाटतात. अरविंद यांचे निधन हा अनेकांसाठी धक्कादायक वाटणारा क्षण आहे. खूपसे लोक त्यांचे मोठे चाहते आहेत, सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या पोस्ट शेअर होत असतात शिवाय त्यावर कमेंट्स आणि लाईक्स सुद्धा वर्षाव होत असतो. मराठी कलाविश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी अरविंद यांच्या निधना निमित्त शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी त्यांच्या सोबतच गोड आठवणींना आपुलकीने उजाळा दिला आहे.

सोशल मीडियावर सुद्धा खुपजण उदास आहेत, अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबतच अरविंद यांच्याशी असलेली मैत्री देखील अनेकांनी दाखवून दिली आहे. एक कलाकार म्हणून तर प्रसिद्ध होतेच तसेच एक माणूस म्हणून देखील त्यांचा स्वभाव खूप छान होता. त्यांच्या भूमिकांनी प्रत्येक वेळी एक आकर्षक वळण घेत कलाविश्वात आपले पक्के स्थान निर्माण केले आहे. म्हणून तर आज घराघरात त्यांच्या नावाची लोकप्रियता वाढत आहे. जरी आज अरविंद आपल्या सोबत नसले तरीही त्यांच्या भूमिकेतून ते सदैव सोबत राहतील. आमच्या कडूनही अरविंद धनु यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment

Close Visit Np online