कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे चे घर आहे खूपच सुंदर…नवऱ्यासोबत काढलेले फोटो केले शेअर..
मित्रहो अभिनय क्षेत्रातील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आपल्या कलेमुळे नेहमीच लोकप्रिय असतात. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांची प्रचंड हवा असते, सतत त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अभिनेत्रीचे फोटो चाहत्यांना खूप आकर्षित करतात, त्यांच्याप्रती आणखीन उत्सुकता व लोकप्रियता चाहत्यांच्या मनात वाढते. कलाकारांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्सुक असतात. म्हणून तर सोशल मीडियावर कलाकारांची माहिती जास्तीत जास्त सर्च होत असते.
मित्रहो आज आपण त्यांच्यापैकीच एका कॉमेडी क्वीन बद्दल जाणून घेणार आहोत, ही कॉमेडी क्वीन म्हणजे सर्वांची लाडकी श्रेया बुगडे आहे. अवघ्या महाराष्ट्रात श्रेया प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिध्द झाली आहे. तिच्या एका स्माईलवर चाहते फिदा असतात शिवाय तिचा अफलातून अभिनय तर नेहमी जीव रमवतो. आजवर तिने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे, भाऊ कदम यांच्या सोबत तिची जोडी भरपूर गाजली आहे. श्रेयाचा अभिनय पाण्यासारखा असतो, कोणत्याही साच्यात म्हणजे भूमिकेत तिचा अभिनय नेहमीच खुलून दिसतो.
View this post on Instagram
श्रेया सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, आपले व आपल्या पतीचे फोटो ती चाहत्यांना शेअर करत असते. त्यामुळे प्रोफेशनल लाईफ सोबतच ती पर्सनल लाईफ मध्ये काय करत आहे ते चाहत्यांना लगेच समजते. नुकतेच तिने आपल्या नवऱ्या सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहुन अनेकांनी तिचे कौतुक केले असून यावर खूप छान छान कमेन्ट देखील येत आहेत. फोटोतील तिचा लुक प्रचंड आकर्षक असून, कॉमेडी क्वीनचे हे रूप अगदीच घायाळ करणारे आहे. तिच्या साधेपणातील सुंदरता खूप रेखीव आहे.
View this post on Instagram
तिने तिचे घर खूपच सुंदर सजवले आहे, घराचा अगदी प्रत्येक कोपरा रेखीव वाटतो. घरात खूप मोठी बाल्कनी आहे, तिथे विविध झाडांची रोपं लावलेली आहेत. घरातील इंटेरिअर पार्टवर श्रेयाने प्रचंड मेहनत घेतलेली दिसते आहे. घरातील किचन, बेडरूम, हॉल इथे खूप सुंदर सजावट केलेली आहे. घराची प्रत्येक बाजू आपुलकी दाखवते. त्यामुळे जसे चाहते श्रेयाला पसंद करतात तसेच ते तिच्या घराला देखील पसंद करतात. व्हायरल झालेले फोटो भरपूर चर्चा रंगवत आहेत.
View this post on Instagram
श्रेयाची बाल्कनी खूप आकर्षित करते, तिला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. नेहमीच ती निवांत पुस्तके वाचताना दिसते. विविध फुलांमध्ये सजलेली श्रेया खूप गोड वाटते, तिला सोशल मीडियावर खूप छान छान कमेन्ट येतात. तुम्हाला तिचे घर व तिचे फोटो कसे वाटले ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.