फोटो मध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखले का? आहे मराठी आणि हिंदी सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री..

सध्याचे वातावरण पाहता आजकाल सोशल मीडियाचे माध्यम एवढे प्रभावी बनले आहे की कधी, कुठे आणि काय व्हायरल होईल हे सांगताही येणार नाही! सोशल मीडियावर दर दिवशी कोणाचे ना कोणाचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध होतच असतात. यातच सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून आणि त्या अभिनेत्रीचा सध्याचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! दोन्ही फोटोमध्ये खूपच फरक दिसून येत आहे. बालपण ते आतापर्यंतच्या फोटोंचा तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया हँडल वर पोस्ट केला आहे.

 

आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसत आहे. व्हिडीओ मध्ये दिसणारी ही लोकप्रिय अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठी आणि हिंदी कलाविश्वास आपल्या अभिनयाची अनोखी छाप सोडणारी आपली मराठमोळी ‘अमृता खानविलकर’ आहे! अमृता मध्ये झालेला हा बदल पाहून तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्य वाटलं आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने आपल्या दमदार अभिनयाने तर रसिक प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलीच आहे, मात्र अमृताच्या निखळ हास्याचे आणि सौंदर्याचे देखील लाखो फॅन्स आहेत! त्यामुळे ती कायमच चर्चेत राहते आणि नेहमीच सोशल मीडिया वर वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अमृताने हा व्हिडिओ शेअर करत तिच्या बालपणी पासून ते आतापर्यंतच्या एकंदर प्रवासाची छोटी झलक क्लिप मार्फत तिच्या फॅन्सला दाखवली आहे. तिच्या या व्हिडिओवर फॅन्सकडून लाईक्स आणि वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा भरभरून वर्षाव होत असलेला दिसत आहे. तिच्या पतीने देखील शेअर केलेल्या पोस्टवर हृदयाची इमोजी देत कमेंट केली आहे.

 

याबरोबरच अमृताची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील ‘टू हॉट’ अशी कमेंट या व्हिडिओवर केली असल्याचे समजत आहे.

अमृताने मराठी आणि बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवत प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान मिळवल आहे! नुकतच काही महिन्यांपूर्वी अमृताच्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमाने तिला पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आणलं होत. चंद्रमुखी सिनेमा आणि त्यात तिने दाखवलेली अदाकारी, त्यातील गाणी तिचे एक्सप्रेशन या सर्वांचीच सोशल मीडियावर तुफान हाईप पसरली होती! या सिनेमामुळे तिची चंद्रा अशी एक नवीनच ओळख निर्माण झालेली आहे!

Leave a Comment

Close Visit uttamsheti