बॉयकॉट ट्रेंड मुळे आमिर खानने घेतला मोठा निर्णय! भारत सोडून जाणार ‘या’ देशात!

चित्रपटामध्ये काम करणारे हिरो हिरोईन आपला सिनेमा हिट व्हावा यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. मात्र काही वेळा त्यांचा सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत नाही आणि त्यामुळेच बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील याचा परिणाम होतो. एखादा चित्रपट बनण्यासाठी त्याच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, इतर कलाकार, संगीतकार या सर्वांनी कसून मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जेव्हा एखादा सिनेमा फ्लॉप होतो तेव्हा त्यांच्या मनात कसे विचार येत असतील? हे फक्त त्यांनाच ठाऊक असतात! बहुतेक लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आणि यातील मुख्य अभिनेता आमिर खानला असेच वाटत असेल. आमिरच्या या चित्रपटाचे बहुतेकांनी कौतुक केले असले तरी बॉयकॉट ट्रेंडमुळे या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. याच पार्श्वभूमीवर आमिर खान बद्दल सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे.

 

दिग्गज अभिनेता आमिर खान हा सध्या मोठ्या काळासाठी विश्रांती घेत असल्याची ही बातमी आहे. यासाठी तो जवळपास दोन महिन्यांकरिता भारत सोडून अमेरिकेमध्ये राहण्यासाठी जात आहे.

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा २०२२ मधील चर्चेत आलेल्या मोठ्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमामधून बऱ्याच कालावधीनंतर आमिर मोठ्या पडद्यावर झळकणार होता, त्यामुळे त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे फॅन्स देखील खूपच उत्सुक होते. रक्षाबंधनाचे औचित्य साधत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपट समीक्षकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या की, स्वातंत्र्य दिन आणि राखी पौर्णिमेचा सण या दोन्हीमुळे मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत बहुसंख्य प्रेक्षक सिनेमागृहात येतील! परंतु असे काहीच झाले नाही.

आमिरच्या लालसिंग चढ्ढा या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जवळपास ४५.८३ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमावले! तब्बल १८० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाला यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. मीडियामधील आलेल्या बातम्यानुसार आमिर खान आता दोन महिन्यांच्या कालावधीसाठी अमेरिकेला जाणार आहे. मात्र खरी बातमी अशी आहे की तो गेल्या तीन वर्षांपासून अद्वैत चंदन यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या त्याच्या आगामी सिनेमामध्ये सहभागी होण्यासाठी तिकडे जात आहे आणि याच दरम्यान आमीरला आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्याआधी काही काळ आराम देखील करायचा आहे.

आमिर खानच्या फॅन्स सध्या असं म्हणणं आहे की, “लालसिंग चढ्ढाच्या अपयशामुळे आमिर खान प्रचंड निराश झाला आहे. त्यामुळे त्याला आगामी काही महिन्यांसाठी विश्रांती घ्यायची आहे” तर काही चाहते असे म्हणत आहेत की, “आमिर खान त्याचा या सुट्ट्या एन्जॉय करून मगच पुढील सिनेमाच्या प्रोजेक्टच्या तयारीसाठी सज्ज होणार आहे.”

Leave a Comment

Close Visit Np online