प्रेक्षकांना खळखळून हसायला लावत त्यांचे मनोरंजन करणाऱ्या भरत जाधव यांच्या लेकीचा फोटो पाहिलात का? अभिनय क्षेत्र न निवडता बनली आहे डॉक्टर!

मराठी सिनेसृष्टीमध्ये आजपर्यंत बरेच नावाजलेले कलाकार भरपूर गाजलेले दिसतात! त्यांच्या अप्रतिम अभिनयाचे कलाविष्कार रसिक प्रेक्षक पुन्हा पुन्हा आवडीने पहात असतात. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम हे यातीलच काही दिग्गज अभिनेते! यातीलच एक अभिनेता म्हणजे त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने त्यांनी मराठी रंगभूमीला प्रकाश झोतात आणले आहे! विशेष म्हणजे त्यांचा प्रत्येक चित्रपटही आजपर्यंत दणक्यात गाजलेला आहे. नाट्यगृह ते मोठा पडदा सगळेच ठिकाणी अभिनय सम्राट म्हणून ज्यांच्या नावावर मोहर उठली आहे असे अष्टपैलू अभिनेते म्हणजे भरत जाधव! अभिनेता भरत जाधव यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील त्यांच्या लोटपोट हसवणाऱ्या भूमिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात.

 

भरत जाधव हे मराठी रंगभूमीवरील अनेक मराठी चित्रपटात, नाटकात वेगवेगळ्या नावांनी पडद्यावर गाजलेले दिसतात. नाटक असो वा चित्रपट त्यांच्या प्रत्येक एन्ट्री मध्ये एक खास वेगळेपणा जाणवतो. म्हणूनच त्यांची लोकप्रियता आज देखील कायम आहे. भरत जाधव यांच्या बद्दल तर सगळी माहिती प्रेक्षकांना माहीतच आहे, पण आज आपण त्यांच्या लेकी बद्दलची खास माहिती या लेखातून घेणार आहोत.

आपल्या सोशल मीडिया हँडलवर भरत जाधव अनेकदा सक्रिय असलेले दिसतात. ते कायमच आपले व आपल्या परिवारातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करत असतात.

सिनेविश्वातील प्रत्येक कलाकार त्यांच्या वैयक्तिक जीवनात कसे असतात? त्यांच्या जीवनात काय सुरू आहे? हे माहिती करून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक असतात. अभिनेता भरत जाधव यांची थोरली मुलगी देखील खूप छान दिसते आणि वडील एवढे दिग्गज कलाकार असताना देखील अभिनय क्षेत्रात न येता तिने स्वतःच्या करिअर साठी वैद्यकीय क्षेत्राची निवड केली, आणि आज ती या क्षेत्रात लौकिक मिळवण्याचा प्रयत्न करत आहे! तिचं नाव सुरभी जाधव असे असून मागच्या वर्षी ती एमबीबीएस परीक्षेत उत्तम मार्कांनी पास देखील झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर सुरभी जाधव हिने पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर सुरभी अधिक सक्रिय नसली तरी अभिनेता भरत कायमच आपल्या मुली सोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करत राहतात.

आज पाहायला गेलं तर भरत जाधव यांचे राहणीमान देखील अगदी साधे आहे. मात्र त्यांच्या कलेच्या पातळीने त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहचवलं आहे!

Leave a Comment

Close Visit uttamsheti