मित्रहो दिवसेंदिवस धक्कादायक बातम्या नेटकऱ्यांचे दार ठोठावत आहेत, या बातम्यांमुळे सोशल मीडियावर देखील दुःखी वातावरण पसरले आहे. मित्रहो “मौसम” , “सत्ते पे सत्ता” , “आहिस्ता आहिस्ता”, “दुरीया”,” हकीकत” यांसारख्या अनेक निरनिराळ्या चित्रपटांसाठी आपला आवाज ज्यांनी दिला आणि अविस्मरणीय गाणी गायली हेच ते ज्येष्ठ गझल गायक भुपींदर सिंग यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावर ही खबर पसरताच अनेकजण ही बातमी ऐकून थक्क आले आहेत. त्यांचे सर्व चाहते त्यांच्या स्मरणार्थ अश्रू ढाळत आहेत.
मुंबई मधील क्रीटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, १० दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती अगदी गंभीर होती. कॅन्सर झाल्याचा सर्वाना संशय होता, सोबतच कोविड मुळे सुद्धा त्यांना त्रास होत होता. अशा गंभीर स्थिती मध्ये उपचार करत असताना मोठ्या आतड्यात कर्करोग झाल्याची शक्यता जाणवत होती. इतकेच नसून त्यांना कोविड सुद्धा झाला होता. त्यामुळे एकंदर ते हालाखीच्या परिस्थितीतून जीवनाचा प्रवास करत होते. एकीकडे स्कॅनिंग मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याची शक्यता स्पष्ट दिसत होती, तर दुसरीकडे त्यांचा कोरोना देखील बरा होत न्हवता.
अगदी दोन्ही आजारातून त्यांचे शरीर पिळवटून निघत होते. अखेर सोमवारी सांयकाळी ७:३० वाजता त्यांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार भुपींदर सिंग यांचा मृत्यू अनेक विकारांमुळे झाला आहे, सोशल मीडियावर अनेक सेलेब्स, चाहते, नेटकरी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या स्मरणार्थ अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. आपण गझल गायक भुपींदर सिंग यांना चांगलच ओळखतो, त्यांची कारकीर्द कोणापासून लपलेली नाही. अतिशय उत्कृष्ट आणि संगीतला योग्य रीतीने जाणणारे ते गायक होते.
“दिल धुंदता है” , “दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता”, “यांसारखी अनेक गाणी त्यांनी गायली आहे. या गाण्यातील ताल, सूर आजही रसिकांच्या ओठांवर सहज येतात. त्यांचा आवाज चाहत्यांना प्रचंड आवडतो, त्यामुळे आवाजातून ते नेहमीच अजरामर राहतील हे नक्की आहे. लहानपणी त्यांनी आपल्या वडिलांकडून गिटार वाजवायला शिकली होती. लहान असल्यापासूनच त्यांना संगीत खूप प्रिय आहे. त्यासाठी त्यांनी मेहनत देखील खूप घेतली आहे. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतले होते, नंतर आपले कौशल्य उत्तम सुधारले व ते या क्षेत्रात वळले.
ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्यांनी गिटार वादक आणि एक गायक म्हणून काम केले, संगीतकार मदन मोहन यांनी १९६४ मध्ये त्यांना मोठा ब्रेक दिला. भुपींदर सिंग यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला होता. १९८७ मध्ये त्यांनी एक गुलजार लिहला “वो जो शहर था”, यातून त्यांना भरपूर लोकप्रियता मिळाली होती. आजही लोक खूप आवडीने ऐकतात. १९८० मध्ये त्यांनी बंगाली गायिका मिताली मुखर्जी सोबत आपली लग्नगाठ बांधली होती. आता भुपींदर यांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला आहे. मात्र तरीही त्यांच्या गाण्यातील आवाजाच्या रुपात ते नेहमीच आपल्या सोबत राहतील. आमच्या कडून सुद्धा भुपींदर सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली !