मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरची गुड न्यूज वाचलीत का! लवकरच सुरू करणार आहे ‘हे’ काम..

0

प्रत्येक माणूस आयुष्य जगताना काही ना काही स्वप्न पाहतच असतो, त्याचे ते ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झटतच राहतो! खूपवेळा त्याचे ते स्वप्न पूर्ण होत नाही, म्हणून तो अस्वस्थच राहतो.. परंतु एकदा का त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या सीमारेषेवर आलं की त्यासारखा आनंदी माणूस फक्त तोच असतो! असाच काहीसा प्रसंग मराठीतील लाडका अभिनेता संतोष जुवेकर याच्याबाबतीत घडला आहे.

काही वर्षांपूर्वी संतोष जुवेकर ह्याने सुद्धा एक स्वप्न पाहिलेलं आणि त्यासाठी अखंड प्रयत्न करत राहिलेला आणि आता अखेरीस त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात आलेलं पाहायला मिळत आहे. याच संदर्भात संतोषने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून एक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये संतोषने सुरुवातीलाच सांगितल आहे की,

मित्रांनो एक स्वप्नं होत आहे…’ त्यानं पोस्टमध्ये पुढं लिहिलं आहे की,’ठाण्यात एक फिल्म स्कूल असावं जिथे सामान्य घरातल्या मुलांना,मुलींना ज्यांना या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे. त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि अॅडमिशन फी सुद्धा परवडणारी असावी. त्यांना उत्तम ट्रेनिंगही मिळावं आणि ई दृश्यम फिल्म अँड इंटरटनेमेंट स्कूलच्या रूपात ते स्वप्न तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांनी आणि बाप्पाच्या आशिर्वादानं पूर्ण झालं. आता त्याला एनएसडीसी (National skill Development council)गर्व्हमेंट रेकनाईज्ड ट्रेनिंग पार्टनरशिप (Goverment Recognized Training partnership) आणि एमईएससी (Media & Entertainment Skill Council) मान्यता मिळाली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

त्याच्या या पोस्टचा अर्थ असाच होतो की, अभिनेता संतोष जुवेकर यांने दृश्यम फिल्म अँड इंटरटेनमेंट स्कूल हे फिल्म स्कूल सुरू केलं आहे. मुंबईमधील ठाणे या शहरात ही शाळा सुरू झाली आहे. हीच गोड बातमी संतोषने त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून त्याच्या फॅन्स सोबत शेअर केली आहे. संतोषने काढलेल्या या फिल्म स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी कमी पैशांमध्ये अभिनय, नृत्य, फोटोग्राफी आणि चित्रपट निर्मिती बाबतचे प्रशिक्षण मिळणार आहे. संतोषच्या या अथक प्रयत्नांना अखेर सरकारची ही साथ मिळाली आहे. त्याच्या या स्कूलमध्ये संतोष जुवेकर स्वतः विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे शिकवताना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान संतोषने कांदे पोहे, मोरया, झेंडा, रेगे यांसारख्या सिनेमांमधून दमदार भूमिका निभावत सिनेसृष्टीमध्ये आपली एक वेगळीच छाप उमटवली आहे. आणि आता आगामी काळात तो ‘धारावी बँक’ या वेब सिरीज मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी यायला सज्ज झाला आहे. या नवीन स्कूल साठी संतोषला मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप