‘या’ मालिकेने पटकावला ‘महाराष्ट्राची नंबर १ मालिका’ होण्याचा मान!

छोट्या पडद्यावरचा सगळा खेळ हा मालिकेच्या टीआरपी वर अवलंबून असतो. आजच्या या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की, मराठी मनोरंजन मालिका विश्वातील मराठीतील १० मुख्य मालिका कोणत्या? आणि यापैकी कोणती मालिका ही महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली आहे ते! यामध्ये एकूण १० मालिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 

यातील नंबर १० वर येते ती मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेचा सध्याचा टीआरपी ४.२ असा आहे. यानंतर नंबर ९ वर येते झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका. परंतु ही मालिका लवकरच संपणार असल्याने या मालिकेचा टीआरपी कमी होत चालला आहे. सध्या या मालिकेचा टीआरपी ४.५ आहे.

यानंतर नंबर ८ वर जी सिरीयल येते ती म्हणजे अक्षर गोठारी आणि पूजा बिरारी यांची ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेचा सध्याचा टीआरपी ४.७ असा आहे. यानंतर नंबर ७ वर जी मालिका येते तिचे नाव आहे, स्टार प्रवाह वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेचा टीआरपी सध्या ५.२ असा झालेला आहे.

यानंतर नंबर ६ वर जी मालिका आहे ती आहे झी मराठीवरील प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे या जोडीची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही सिरीयल देखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेचा टीआरपी ५.५ असा आहे. यानंतर नंबर ५ वरती स्टार प्रवाह वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही सिरीयल येते. यातील शशांक आणि अपूर्वा ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेचा टीआरपी ५.८ असा आहे.

यानंतर नंबर ४ वर जी मालिका येते ती आहे, स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या सिरीयल मधील शुभम आणि कीर्ती या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेचा टीआरपी ६.१ एवढा आहे. यानंतर नंबर ३ वर जी मालिका येते ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका. ही मालिका या आधी नंबर १ वर सुद्धा येऊन गेलेली आहे. या मालिकेतील अरुंधती ही भूमिका रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेचा टीआरपी ६.२ एवढा आहे.

नंबर २ वर जी मालिका आहे ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यातील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. ही मालिका देखील सलग दोन वेळा नंबर १ वर येऊन गेली आहे. पण यावेळी तिचा नंबर २ वर आलेला आहे आणि या मालिकेचा टीआरपी ६.५ असा आहे.

यावेळी नंबर १ वर जी मालिका आली आहे ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही सीरिअल. ही मालिका देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे आणि या मालिकेमधील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यश मिळवले आहे. या सर्वांतील ‘रंग माझ्या वेगळा’ या मालिकेने नंबर १ चा क्रमांक पटकावला आहे आणि या मालिकेसाठी टीआरपी ६.७ असा आलेला आहे.

तरी या १० होत्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या फेवरेट मालिका! या मालिकांशिवाय ‘लग्नाची बेडी’ ‘भाग्य दिले तू मला’ यांसारख्या मालिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर या मालिकांचा देखील या मुख्य १० मालिकांमध्ये समावेश होऊ शकतो.

Leave a Comment

Close Visit uttamsheti