७५ व्या वाढदिवसानिमित्त विमान सवारी !.अभिनेत्रीने आई बाबांना दिले असे गिफ्ट…

मित्रहो नुकताच एक मराठमोळी अभिनेत्री विशेष चर्चेत आली आहे, सोशल मीडियावर तिची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर जी मराठी कलाविश्वात हल्ली प्रचंड सक्रिय अभिनेत्री आहे. “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेत ती शालिनीची भूमिका निभावत आहे. तिची भूमिका बघता बघता प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पात्र ठरली आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. पण इतकी सुंदर आणि उत्कृष्ट भूमिका पाहून चाहते मात्र खूप खुश आहेत. ती सोशल मीडियावर देखील खुप सक्रिय असते, नुकताच तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

 

माधवीच्या वडिलांचा नुकताच ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे, तिने तिच्या आई वडिलांसोबत एक फोटो शेअर करून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक नेटकरी सुद्धा कमेन्ट करत तिच्या वडिलांना शुभेच्छा देत आहेत. मध्यंतरी माधवीने तिच्या आई वडिलांना विमान प्रवास घडवून आणला होता. विमानतळावरील काही फोटो तिने शेअर केले होते. आई बाबांसोबत आयुष्याचे हे गोड क्षण तिने चाहत्यांशी वाटून घेतले होते. तिच्या आनंदला त्यावेळी खूप भरती आली होती.

तिने विमानातील देखील अनेक फोटो शेअर केले होते, यावर नेटकरी खूप लाईक्स आणि कमेन्ट करत होते. या फोटो मध्ये तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक निराळेच समाधान आणि आनंद, सुख झळकत होते. त्यांचा हा आनंद कदाचित शब्दात मांडता येणार नाही. मात्र तरीही नेटकऱ्यांनी हा आनंद ओळखला. माधवी ही रंगभूमीवरील प्रसिध्द अभिनेत्री आहे, ती कलाविश्वात विशेष सक्रिय आहे. “अवघाची संसार” मालिकेतून तिने पडद्यावर पदार्पण केले होते. पुढे तिने “स्वप्नांच्या पलीकडे” या मालिकेत देखील काम केले होते.

तसेच “जावई विकत घेणे आहे” या मालिकेतून सुद्धा पडद्यावर अभिनय केला होता. सध्या ती साकारत असलेली शालिनी प्रेक्षकांना खूप भावली आहे, अनेकांना तिची ही भूमिका खूप आवडली आहे. “सुख म्हणजे नक्की काय असतं” ही मालिका बघता बघता खूप लोकप्रिय ठरली आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक मंडळी या मालिकेचे दिवाने आहेत. मालिकेतील अनेक भूमिका खूप प्रसिद्ध होत आहेत. सोबतच यातील शालिनी ही नकारात्मक भूमिका असूनही मालिकेत सकारात्मक लोकप्रियता घडवून आणत आहे.

शालिनी म्हणजेच माधवी ही अवघ्या महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री बनत आहे. तिच्या आजवरच्या सर्व भूमिका प्रेक्षकांवर खूप जादू करून गेल्या आहेत. इथून पुढे देखील तीला अशाच आव्हानात्मक भूमिका मिळत राहो व त्या भूमिका उत्तम वठवण्यासाठी तिला अभिनयाची ताकद मिळत राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुध्दा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit Np online