‘देवमाणूस २’ सिरीयल मध्ये आले उत्कंठावर्धक वळण! असा होणार मालिकेचा शेवट!

झी मराठीवरील ‘देवमाणूस २’ या मालिकेत सध्या एकापेक्षा एक बहारदार ट्विस्ट आणि टर्न रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यामध्ये अजितकुमार लागोपाठ खून करत आहे, परंतु अद्यापही इन्स्पेक्टर जामकर यांना त्याला अटक करण्यात यश मिळालेले नाही. ही मालिका आता शेवटच्या वळणावर येऊन पोहोचल्यामुळे यात सतत ट्विस्ट आणून मालिका अधिकच मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. अशातच ‘देवमाणूस २’ आता एका वेगळ्याच उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.

 

आणि या सोबतच अजित कुमारचा खेळ संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण लोकांचा हा देवमाणूस लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर या मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासूनच ‘देवमाणूस २’ ही मालिका संपणार असल्याच्या बातम्यांना पेव फुटलं होतं! परंतु आता या मालिकेचा शेवट कसा होणार? याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमची आवडती मालिका ‘देवमाणूस २’ हिचा शेवट कसा असेल ते!

या मालिकेत अजित कुमारला शेवटी अटक होणार आहे. देवमाणूस या मालिकेच्या इंस्टाग्राम पेजवर याबद्दलचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अजितला अटक होऊन तो खाली बसलेला दिसत आहे आणि त्यासोबतच त्याच्यामागे इन्स्पेक्टर जामकर आणि इतर पोलीसही उभे राहिलेले दिसत आहेत. पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमुळे मालिकेच्या प्रेक्षकांना अजित कसा पकडला जाणार? याबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे!

खूप दिवसांपासूनच इन्स्पेक्टर जामकर अजित कुमारला आपल्या जाळ्यात अडकवून अटक करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत, परंतु त्याला अजित विरोधात सबळ पुरावा न मिळाल्यामुळे ते वैतागले आहेत. अशातच अजितने बज्याचा खून केल्यापासून जामकर अजितवर भयानक रागावले आहेत आणि आता नाम्या अजितकुमार विरोधात पुरावे शोधण्याकरिता इन्स्पेक्टर जामकरला मदत करणार आहे. याचबरोबर डिंपलने ही अजित विरोधात भरपूर पुरावा गोळा केलेला आहे. आता मिळवलेला पुरावा ती इन्स्पेक्टर जामकरला देऊन माफीची साक्षीदार बनणार? का तिच्या पुराव्यामुळे अजित पकडला जाणार? हे बघण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे!

मागील काही दिवसांपासून मालिकेला कमी टीआरपी मिळाल्यामुळे ‘देवमाणूस २’ ही मालिका संपणार असल्याची चर्चा छोट्या पडद्यावर रंगली होती. त्यामुळे मालिकेला अजून टीआरपी मिळवून देण्यासाठी यात वेगवेगळ्या पात्रांची एन्ट्री करण्यात येत होती. यावेळी इन्स्पेक्टर जामकरची मालिकेत एन्ट्री झाल्यापासून ‘देवमाणूस २’ या सिरीयलचा टीआरपी दणक्यात वाढला होता आणि अशातच आता ही मालिका त्याच्या शेवटच्या पर्वावर येऊन थांबली आहे!

Leave a Comment

Close Visit uttamsheti