‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी झाली सत्यनारायणाची पूजा..

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ सिरीयल अगदी थोड्या कालावधीतच रसिकप्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली दिसत आहे! या मागचं कारण म्हणजे या मालिकेत असणारी तगडी स्टार कास्ट आणि त्यांचा नैसर्गिक अभिनय! यामुळे या मालिकेला लोकांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतले आहे. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांचं लग्न होऊन त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होते ना होते तोच या सिरीयल मध्ये नेहाच्या आधीच्या नवऱ्याची एन्ट्री झालेली दाखवण्यात आली आहे. एवढेच नाही तर तो चक्क परीचा ड्रायव्हर म्हणून थेट यशच्या घरात प्रवेश करताना दिसला आहे.

 

आणि आता सिम्मीला देखील हा सर्व प्रकार माहित झाल्याचा फायदा उठवत सिम्मी देखील नेहाच्या विरोधात वेगवेगळे कटकारस्थान रचना पाहायला मिळत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सिरीयल मध्ये सिम्मीच पात्र साकार करणारी गुणी अभिनेत्री आहे ‘शितल क्षीरसागर’
शितल या आधी झी मराठी वरील ‘का रे दुरावा’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये विरोधी भूमिका निभावताना दिसली होती.

लहानपणापासूनच ग्लॅमरस दुनियेच आकर्षण असणाऱ्या शितल क्षीरसागरला मोठे झाल्यावर आपण अभिनेत्री व्हावं असं वाटत होतं. त्यामुळे वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच मासूम नावाचा हिंदी सिनेमा पाहून तिने तिच्या आई-वडिलांना ‘या सिनेमामध्ये मला या लहान मुलीची भूमिका का नाही दिली?’ असा निरागस प्रश्न विचारला होता. तेव्हापासूनच शितलमध्ये अभिनयाबद्दल रुची निर्माण झाली. त्यानंतर तिने नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नाटकातून वेगवेगळ्या भूमिका साकारत, जागतिक दर्जाच्या कलाकारांचे आत्मचरित्र वाचून तिने त्यातून प्रेरणा घेतली. कॉलेजमध्ये असताना तिने अनेक एकांकिकेमध्ये सहभाग घेत नाट्य स्पर्धा गाजवल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shitaal Kshirsaagar (@shitaal.kshirsaagar)

त्यानंतर ‘आरंभ’ आणि ‘एक होती वादी’ या सिनेमातील महत्त्वपूर्ण भूमिका तिच्या वाट्याला आल्या! यातील ‘एक होती वादी’ यातील वादीची भूमिका मुकी असल्यामुळे अत्यंत आव्हानात्मक होती. केवळ चेहऱ्यावरील हावभावांवरूनच तिला ती भूमिका साकारायची होती. मात्र तिच्या या भूमिकेला कौतुकाची थाप अनेक नामवंत कलाकारांकडून मिळाली आणि ‘एक होती वादी’ या सिनेमाला महाराष्ट्र शासनासह तब्बल ५३ पुरस्कार त्यावेळी मिळाले!

काही दिवसांपूर्वी शितलच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली. त्या क्षणांचे काही फोटो पोस्ट करताना ती म्हणाली की,

”श्रावणात घरामध्ये सत्य नारायण पूजा व्हावी अशी इच्छा गेली काही वर्षे मनात रेंगाळत होती..पण काही ना काही कारणाने ती पूर्ण होत नव्हती. So finally ह्या वर्षी १५ ऑगस्टला देशभर स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष होतं असताना आमचं घर विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुक्त पारायणाने आणि फुलांच्या,धुपाच्या, अगरबत्तीच्या आणि नैवेद्याच्या सुगंधाने न्हाऊन निघालं. सोबतीला श्रावण आपलं वैभव दाखवत ऊन पावसाचे रंग उधळत होता. कुटुंबातील सगळे जण एक सोडून (ओजस माझा भाचा शिक्षणासाठी बाहेर असल्याने) हजर होते ह्याचा जास्त आनंद आहे.पण साहजिकच आम्ही आमचा लाडका मुलगा ओजस मुळापासूनच मिस केला. हे माझ्या सर्व इंस्टा परिवारासोबत शेअर करावे असे वाटले. तुम्हा सर्वांना आनंदी, निरोगी, श्रीमंत आणि आशीर्वादित आयुष्याच्या शुभेच्छा….!”

Leave a Comment

Close Visit uttamsheti