आलिया, बिपाशा नंतर आता कॅटरिनाचा नंबर, लवकरच देणार गोड बातमी..

गेल्या वर्षी अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचे लग्न मिडिया मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं होतं. या दोघांनीही त्यावेळी त्यांच्या लग्नाची कोणतीच अधिकृत घोषणा जाहीर केलेली नव्हती, परंतु तरीही मीडियाला या गोष्टीबद्दल समजलं होतं. त्यानंतर या दोघांनी कडेकोट बंदोबस्तात आपला लग्न सोहळा पार पाडला होता. गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी कॅटरिना आणि विकी यांचा लग्न सोहळा राजस्थान मधील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे संपन्न झाला होता. यावेळी दोघांनी आपलं लग्न अत्यंत खाजगी पद्धतीने केलं होतं. त्यावेळी यांच्या लग्नाला काही जवळचे मित्र आणि त्यांचे परिवारातील सदस्य सहभागी झालेले.

 

या पार्श्वभूमीवर सध्या बॉलीवूड मधून एकापाठोपाठ एक अभिनेत्री आपल्या प्रेग्नेंसीच्या गोड बातम्या देताना दिसत आहेत. आलिया भट, सोनम कपूर, बिपाशा बसू आता यानंतर सर्वांचं लक्ष लोकप्रिय अभिनेत्री कैटरीना कैफ कडे लागल आहे. विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाला जवळपास आता सहा महिने पूर्ण होत आहेत. अशातच कॅटरिना प्रेग्नेंट असल्याचा बातम्या सतत मीडियासमोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच कॅटरिनाने या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगत फेटाळल्या होत्या, यानंतरच आता एक नवा रिपोर्ट मीडिया समोर आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या लेखातून काय आहे हा रिपोर्ट!

गेल्या वेळेस कॅटरिना कैफ आपल्या लग्नामुळे मीडियात भरपूर चर्चेत आलेली आणि यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री कैटरीना कैफ सध्या कायमच ओवर साईज ड्रेस मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कॅटरिना प्रेग्नेंट असून बेबी बंप लपवण्यासाठी ती हे सर्व करत असल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं झालं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा असंच काहीसं झालं होतं. पण त्यानंतर मात्र कॅटरिनाने या सर्व फक्त अफवा आहेत असे सांगत या विषयाला पूर्णविराम दिला होता.

याच दरम्यान बॉलीवूड लाइफ कडून एक नवा रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार कॅटरिना ही प्रेग्नेंट असून ती कॉफी विथ करण मध्ये आपल्या प्रेग्नेंसी बाबत खुलासा करण्याची शक्यता आहे. करण जोहरचा हा कार्यक्रम कॅटरिना आणि विकी कौशल साठी खूपच खास आहे. कारण याच शो दरम्यान या दोघांचीही लव स्टोरी सुरू झाली होती. परंतु असे असले तरी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांनाही आपल्या प्रायव्हेट गोष्टी मीडियासमोर मांडणे मुळीच पसंत नाहीये. त्यामुळेच त्यांनी त्यांचा विवाह सुद्धा अत्यंत खाजगी पद्धतीने केला होता. परंतु असे असले तरी कॅटरिना किंवा विकी या दोघांकडूनही कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.

Leave a Comment

Close Visit Np online