अभिनेता सलमान खानचा नवीन ‘भाईजान’ लुक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहिलात का?

0

सध्या सोशल मीडिया पाहिलं तर तिकडे ‘बॉयकॉट बॉलीवूड’ हा ट्रेंड जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अक्षय कुमार या दोघांचेही सिनेमे बॉयकॉट केल्यानंतर रसिक प्रेक्षक आता बॉलीवूडमधील आगामी झळकणाऱ्या चित्रपटांना देखील बॉयकॉट करा अशा प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. यादरम्यान आमिर खानच्या चित्रपटाचे कौतुक करणाऱ्या ऋतिक रोशनच्या आगामी चित्रपटाला सुद्धा नेटीजन्सकडून असेच टार्गेट करण्यात आलं आहे. शाहरुख खानचे देखील पुढचे ३ ही चित्रपट बॉयकॉट करण्यासाठी नेटकरी पुढे सरसावले आहेत. अशा वातावरणातच बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक फोटो शेअर करत त्याच्या फॅन्सला एक गोड धक्का दिला आहे!

सलमान खानने नुकताच त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून एक फोटो शेअर केला आहे. लेह लडाख परिसरात शूट केलेल्या या फोटोमध्ये सलमान त्याच्या नवीन लुक मध्ये दिसत आहे. यात त्याचे केस वाढलेले आहेत तर त्याच्या बाजूला एक मोटर सायकल असून सलमान या फोटोमध्ये पाठमोरा उभा राहिला आहे. असं म्हणण्यात येत आहे की हा सलमानचा येणारा चित्रपट भाईजान यातील नवीन लूक आहे. नुकतच सलमानने त्याच्या ‘टायगर 3’ चे चित्रीकरण पूर्ण केल असून आता तो ‘भाईजान’ या सिनेमासाठी तयारी करत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही काळापूर्वी नुकतच सलमान आणि प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे यांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं होतं.

मीडियाकडून आलेल्या रिपोर्टनुसार सलमान आणि पूजा हे चार दिवस लेह लडाख मध्ये सिनेमाचे चित्रकरण करणार आहेत आणि यानंतर या सिनेमातील काही महत्त्वपूर्ण सीन्स मुंबईत शूट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सलमानच्या या सिनेमाचं शूटिंग ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल असे अंदाज वर्तवण्यात येत आहे. या शिवाय हा सिनेमा याच वर्षी डिसेंबर महिन्या दरम्यान प्रदर्शित करायची सलमानची इच्छा आहे. या सिनेमामध्ये पूजा हेगडे सोबतच व्यंकटेश आणि जगपती बाबू सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सिनेमाचे पोस्टर पाहता सलमानच्या बाकी सिनेमांप्रमाणे हा चित्रपट देखील एक धडाकेबाज कमर्शियल सिनेमा असणार आहे. या सिनेमातील दोन गाण्यांचं खास चित्रीकरण हैदराबाद मध्ये झालेल आहे. त्यापैकी एका गाण्यात साउथ मधील लोकप्रिय अभिनेता रामचरण ची झलक सुद्धा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे सलमानच्या ‘टायगर 3’ आणि या ‘भाईजान’ साठी त्याचे फॅन अतिशय उत्सुक असल्याचे चित्र समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप