“आता कोर्टात भेटू..” म्हणत अभिनेता रितेश देशमुखने करीनाला पाठवली नोटीस, हे आहे कारण..
बॉलीवूड सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख त्याच्या सोशल मीडिया हँडल वरून कायमच सक्रिय असलेला दिसतो आणि या कारणामुळेच तो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला दिसतो! त्याच्या अकाउंट वरून तो वेळोवेळी फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो जे जोरात व्हायरल होताना दिसतात. यावेळी त्याचा करीना कपूरखान सोबतचा एक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच व्हायरल झालेला दिसत आहे! या व्हिडिओमध्ये तो करीना कपूर खानला ‘कोर्टात भेटूया’ असे सांगत असल्याचे दिसत आहे. यामुळेच सोशल मीडियावर रितेश आणि करीना यांच्या या व्हिडिओची चर्चा रंगलेली आहे.
View this post on Instagram
सध्या रितेश देशमुख त्याच्या ‘केस तो बनता है’ या कॉमेडी शो मुळे चर्चेत आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींना कोर्ट रूममध्ये त्यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर द्यायचे असते. या शोमध्ये आता लवकरच अभिनेत्री करीना कपूर झळकणार आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. या मजेदार प्रोमो मध्ये रितेश करीनाच्या हातात कोर्टाची नोटीस देताना दिसतोय. रितेशने त्याच्या इन्स्टा हँडल वरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.
या व्हिडिओमध्ये करीना कपूर पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत असून ती तिच्या जवळून जाणाऱ्या एका माणसाला पाहून, “कोण आहे जो त्याने माझ्याकडे मागे वळून नाही पाहिले?” असे म्हणताना दिसते यावर रितेश देशमुख म्हणतो “तो कायदा आहे” रितेशच्या उत्तरावर “त्याने मला नोटीस नाही केलं?” असं करीना म्हणताना दिसते, यानंतर रितेश देशमुख “तो नोटीस करत नाही, तो नोटीस पाठवतो! कोर्टात भेटू” असं म्हणतो आणि करीनाच्या हातात नोटीस देतो. हे पाहिल्यावर करीनालाही आश्चर्याचा धक्का बसतो. करीना कपूर आणि रितेश देशमुख या दोघांचाही हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे.
याच दरम्यान रितेश देशमुखच्या या नव्या कॉमेडी शो बद्दल बोलायचं झाल्यास ॲमेझॉन मिनी टीव्हीवर येणारा ‘केस तो बनता है’ हा भारतातील पहिला कोर्ट कॉमेडी शो असणार आहे. ज्यामध्ये रितेश वेगवेगळ्या सेलिब्रिटींवर आरोप लावताना दिसणार आहे. तर या शोमध्ये वरून शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करताना दिसणार आहे आणि यात कुशा कपिला जजची भूमिका निभावत आहेत.
मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार करण जोहर, करीना कपूर, अनिल कपूर, रोहित शेट्टी, वरून धवन पासून ते सारा अली खान पर्यंत सर्व सेलिब्रिटी या कार्यक्रमांमध्ये लवकरच सहभागी होणार आहेत.