२५ वर्षानंतर शक्तिमान पासून ते गीता विश्वास, किलविष पर्यंत..असे दिसतात तुमचे आवडीचे कलाकार!

९० च्या दशकातील अशी व्यक्ती सापडणे कठीणच असेल जिने दूरदर्शनवर शक्तिमान ही मालिका पाहिली नाही. त्याकाळी शक्तिमान हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता आणि त्यातील सर्व भूमिका देखील तितक्याच प्रसिद्ध झालेल्या. अगदी लहान मुलेच नाही तर मोठी माणसे देखील हा कार्यक्रम आवडीने पाहत. १९९७ मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम २००५ मध्ये जेव्हा बंद झाला तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं. मात्र आता पुन्हा एकदा हा शो मोठ्या पडद्यावर येताना दिसणार आहे.

शक्तिमान गंगाधर (मुकेश खन्ना)-
मुकेश खन्ना बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध कलाकार राहिले आहेत. मालिकांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण त्यांना खरी ओळख ही शक्तिमान म्हणूनच मिळाली ती अजून देखील कायम आहे!
शक्तिमान मालिकेत मुकेश खन्ना यांनी दोन भूमिका केलेल्या एक म्हणजे गंगाधरची आणि दुसरी शक्तिमान
यातील शक्तिमानच्या भूमिकेतून तो शत्रूंचा नाश करत असे तर गंगाधरच्या भूमिकेतून तो लोकांना हसवायचा. तेव्हा लोक शक्तिमानचा अंदाज, त्याची स्टाईल सर्व काही कॉपी करायचे. लहान मुलांमध्ये तर त्याची वेगळीच क्रेझ होती!

गीता विश्वास (वैष्णवी महंत) – शक्तिमान या मालिकेमध्ये शक्तीमानची प्रेमिका म्हणून गीता विश्वास यांनी भूमिका निभावलेली. यातून वैष्णवी महंतला भरपूर लोकप्रियता मिळालेली. आज गीता विश्वास उर्फ वैष्णवी ४७ वर्षांची झाली आहे.

डॉक्टर जैकाल (ललित परमार)- शक्तिमान या कार्यक्रमांमध्ये शक्तिमानचा विरोधात वेगवेगळी कारस्थाने रचणाऱ्या डॉक्टरची भूमिका ललित परमारने साकार केलेली आहे.

शलाका (अश्विनी कलसेकर)- शक्तिमान मालिकेत शक्तिमान ची सर्वात मोठी शत्रू असलेली शलाकाची भूमिका अश्विनी कलसेकरने केलेली. अश्विनी आज ५१ वर्षाची झाली आहे.

तमराज किल्विष (सुरेंद्र पाल) – शक्तिमानला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तमराज किलविषची भूमिका सुरेंद्र पाल यांनी केलेली. त्याची भूमिका निगेटिव्ह जरी असली तरीही त्याला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळालेले. त्याचा ‘अंधेरा कायम रहे’ हा डायलॉग आज देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे! सुरेंद्र पाल आज ६८ वर्षाचा झालेला आहे.

धुरंधर सिंह (राजू श्रीवास्तव)- आपल्या कॉमिक टाइमिंगने सर्वांना हसवणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव हा देखील शक्तिमान या मालिकेत होता. या शोमध्ये त्याने धुरंदर सिंहची भूमिका साकारलेली. यात तो पत्रकार होता.

शक्तिमान आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे आणि यात शक्तिमानची भूमिका करण्यासाठी रणवीर सिंहला विचारण्यात आले आहे!

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप