स्टार प्रवाह वाहिनीवरील “ही” मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! जाणून घ्या कसा असेल शेवट!

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही सिरीयल टीआरपीच्या शिखरावर पोहोचलेली दिसत आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. या सिरीयल मध्ये ही दोन पात्रे अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांनी साकारले आहेत.

 

सध्या या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे आणि हा ट्विस्ट अतिशय रोमांचक ठरलेला असून, आता लवकरच ही मालिका आपल्या शेवटच्या भागाकडे प्रस्थान करणार असल्याची चर्चा सगळीकडे पसरली आहे. या मालिकेला महाराष्ट्रातून प्रचंड मोठी फॅन फॉलोविंग असल्याने या सिरीयलचा शेवट कसा होईल? याबाबत सगळ्यांना खूपच उत्सुकता लागलेली आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया या मालिकेचा शेवट कसा असेल ते.

तसं पाहायला गेलं तर ही सिरीयल एका बंगाली मालिकेवर आधारित आहे. त्यामुळे पुढे आपण असं पाहणार आहोत की गौरी प्रेग्नेंट असते आणि त्यामुळे शिर्के पाटील यांच्या वाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण होते. परंतु जयदीप आणि गौरी यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला असतो, मात्र यामुळेच माईसाहेब (वर्षा उसगावकर) घरी परततात आणि पुन्हा सगळं काही आधी सारखं करतात. गौरीची गुड न्यूज ऐकल्याने जयदीप देखील निर्णय बदलतो. पुढे मग माईसाहेब गौरीच्या डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम करणार यामध्येच शालिनी तिचे कारस्थान पुन्हा एकदा रचणार आणि पुढे गौरी एका गोड मुलीला जन्म देईल असेही दाखवण्यात येणार आहे.

त्यानंतर बाळाचे संगोपन करण्याचा निर्णय गौरीने घेतला असल्याने ती कंपनीत जाणार नाही आणि उदयच्या हातात कंपनी गेल्यावर तो कंपनी विकून टाकेल म्हणून दादासाहेब जयदीपला कंपनी सांभाळण्यासाठी सांगतात. दरम्यान शालिनीला मूल नसल्याने ती गौरीवर जळत असेल तर दुसरीकडे गौरी स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी वकिली करण्याचा निर्णय घेइल. यानंतर जयदीपचा आणि घरातून तिला सपोर्ट मिळाल्याने ती ३ वर्षे वकीली शिकायला मुंबईला जाईल आणि मालिकेत ३ वर्षाचा गॅप दाखवण्यात येईल. त्यानंतर गौरी वकील होऊनच मुंबईतून परत येईल. यादरम्यान शालिनी पुन्हा एकदा गौरी आणि तिच्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न करेल, यामुळे मल्हार आणि शालिनीचा घटस्फोट होतो आणि तो तिला कायमची माहेरी पाठवतो. यानंतर देवकी देखील कारस्थान थांबवताना दिसेल आणि मग पुढे मालिकेत तिघेही भाऊ एकत्रित नंदिनी गृह उद्योग सांभाळताना दिसतील. असा असेल या मालिकेचा गोड शेवट!

Leave a Comment

Close Visit Np online