प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची ब्रेन डेड अवस्था..अचानक खराब झाली तब्येत..

मित्रहो बॉलीवूड मधील राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. आजवर त्यांची विनोदी बोली आपल्याला खळखळून हसवुन गेली आहे. त्यांचे अनेक शो, पिक्चर पाहण्यासाठी लोक खूप आतुर असतात. सोशल मीडियावर देखील राजू श्रीवास्तव खूप सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट ,त्यांचे व्हिडिओ नेहमीच विशेष चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही माहिती जाणून सोशल मीडियावर नेटकरी, त्यांचे चाहते खूप काळजी करत आहेत, सोबतच या बातमीमुळे त्यांच्या परिवारावर देखील अतिशय दयनीय परिस्थिती उद्भवली आहे. ही वेळ राजू यांच्यासाठी अतिशय वाईट ठरली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू यांची तब्येत आधी पेक्षा आणखीनच खराब झालेली आहे, सांगितले जात आहे की राजू यांचा ब्रेन जवळपास डेड अवस्था मध्ये गेला आहे. राजू यांचे मुख्य सह कलाकार अजित सक्सेना यांनी ही माहिती सोशल मीडिया वरती सर्वांना दिलेली आहे, प्रसिद्ध विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची अवस्था अतिशय दयनीय असून त्यांची तब्येत खूपच घालवलेली आहे. त्यांचा ब्रेन डेड अवस्थेत जात आहे त्यामुळे त्यांची अनेकांना काळजी वाटत आहे. अजित सक्सेना यांनी देखील ही माहिती सोशल मीडियावर पुरवत असताना म्हटले आहे की आता राजू यांचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे आशा आहे.

आज सकाळी राजू श्रीवास्तव यांच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे की त्यांची तब्येत खूपच खराब होत आहे सोबतच त्यांच्या ब्रेनची वाचण्याची गॅरंटी सुद्धा कमी आहे, त्यांचा ब्रेन काम करत नाहीये. मित्रहो राजू यांचा ब्रेन तर काम करत नाहीच सोबतच त्यांच्या हृदयावर सुद्धा परिणाम होत आहे. हृदय देखील प्रॉब्लेम मध्ये आहे. हृदय आणि मेंदू हे दोन अवयव व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जीवन जगण्यासाठी या दोन अवयवांशी आपणाला खूप गरज असते आणि याच अवयवांच्या वरती जर घात होत असेल तर हे वेळीच थांबवून त्यावर उपचार करणे गरजेचे असते.राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडी आहेत त्यामुळे अनेक लोक त्यांचे जाते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

त्यांच्या अशा खराब तब्येतीची बातमी जाणून त्यांचे अनेक नातेवाईक खूप दुखी झालेले आहेत, अशातच राजू यांच्या घरी कानपूर मध्ये त्यांचे नातेवाईक, परिचित लोक, मित्रमंडळी यांनी गर्दी केली आहे. या सर्वांनाच राजीव यांची खूप काळजी वाटत आहे आणि काळजीपोटी हे सर्वजण त्यांना भेटण्यासाठी तिथे आले आहेत, सोबतच राजू श्रीवास्तव यांच्यासोबत नेहमीच असणारे त्यांचे पीए गर्वित नारंग हे देखील त्यांना भेटण्यासाठी दिल्लीहून कानपूरला पोहोचले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कळले आहे की डॉक्टरांनी राजू यांना इंजेक्शन दिले होते मात्र त्यानंतर त्यांच्या ब्रेनमध्ये सूज आलेली आहे यामुळे इंजेक्शन दिल्यानंतर ही सूज कमी होऊन त्यांचा ब्रेन पूर्ववत होण्यास मदत होईल.

राजू श्रीवास्तव यांच्या घरच्यांसोबत बोलल्यावर समजले की सर्वजण त्यांची खूप काळजी करत आहेत. सर्वांना अजूनही असे वाटत आहे की राजू लवकरच ठीक होऊन घरी परत येतील, १० ऑगस्ट रोजी एक्सरसाइज करत असताना राजू यांना कार्डियक अरेस्ट झाला होता. जवळपास आठ दिवस ते बेशुद्ध होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कळले की त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार राजू यांची प्रकृती अस्थिर झालेली असून त्यांचा ब्रेनडेड अवस्थेमध्ये जाण्याची अधिक शक्यता आहे मात्र तरीही ते लवकरच ठीक होऊन परत येतील अशी अनेक आशा आहे आणि नक्कीच त्यांची तब्येत बरी व्हावी अशी आमची देखील इच्छा आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti