झी मराठी वाहिनीवर होणार या भन्नाट मालिकेची एंट्री.. हा लोकप्रिय शो घेऊ शकतो प्रेक्षकांचा निरोप..

झी मराठी वाहिनीवर आजवर अनेक रंजक आणि लक्षवेधी शोज प्रदर्शित झाले आहेत आणि तितकेच लोकप्रिय देखील झाले आहेत. आता लवकरच झी मराठी वाहिनीवर एक नवीन रिऍलिटी शो दाखल होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मन झालं बाजींद या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेच्या जागी सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेनंतर आता झी मराठी वाहिनीवर डान्स इंडिया डान्स हा नवा रिऍलिटी शो दाखल होत आहे. छोट्या कलाकारांसाठी हा रिऍलिटी शो आयोजित केला असल्याने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकरांची लगबग सुरू झालेली आहे या शोसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे.

या ऑडिशनमधून निवडलेले लिटिल मास्टर्स आपल्या नृत्याची जादू दाखवून डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्सचा किताब पटकवणार आहेत. या नवीन शोमध्ये सूत्रसंचालन तसेच परिक्षकाची धुरा कोण सांभाळणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. अशा रिऍलिटी शोमध्ये आजवर सिद्धार्थ चांदेकर, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, अभिजित खांडेकर

यांसारख्या कलाकारांनी सूत्रसंचालन केले आहे मात्र डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स शोसाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच उलगडणार आहे. या नवीन शोच्या आगमनामुळे झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे बोलले जात आहे.

किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल करण्यात आले. महाराज म्हणून प्रशांत दामले यांची जागा आता गेल्या काही दिवसांपासून निर्मिती सावंत सांभाळत आहेत. या शोचा सेलिब्रिटी अँकर संकर्षण कऱ्हाडे हा देखील नाटकांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने त्याच्या जागी श्रेया बुगडे सध्या या शोचं सूत्रसंचालन करते आहे. संकर्षण नुकताच नाटकाच्या दौऱ्यासाठी लंडनला गेला आहे. त्याच्यासोबत प्रशांत दामले देखील सारखं काहीतरी होतंय या नाटक निमित्ताने लंडनला रवाना झाले आहेत.

ही दोन्ही नाटकं लंडनला सादर केली जात आहेत, त्यामुळे संकर्षणसाठी हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.  तर किचन कल्लाकार आणि माझी तुझी रेशीमगाठ या त्याच्या मालिकेतून ब्रेक घेऊन तो हे दौरे करत आहे. या व्यस्त शेड्युलचा परिणाम आणि सोबतच शोमध्ये कलाकारांचे रिपीट व्हिजीटिंगचा परिणाम म्हणून किचन कल्लाकारचा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही भागांपासून या शोमध्ये तेच तेच कलाकार दाखल झालेले पाहायला मिळाले होते. याचाच अर्थ आता या शोच्या निरोप घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे असे म्हटले जात आहे.

 

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप