झी मराठी वाहिनीवर येणार नवी मालिका, ही अभिनेत्री साकारणार अप्पीची भूमिका..
झी मराठी वाहिनी ही नेहमीच विविध विषयांवरील उत्तम मालिका प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसते. म्हणूनच या वाहिनीची टीआरपी कधीच घसरत नाही. सध्या या मालिकांवर नव्या मालिकांचे पदार्पण होत आहे. आता लवकरच झी मराठीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. सध्या या प्रोमोची सर्वत्र चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठीवर नुकतंच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. या मालिकेत एक वेगळा विषय समोर येणार आहे.
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही एका ग्रामीण भागातील खेडे गावात राहणारी मुलगी आहे. या गावात कोणत्याही शैक्षणिक सुविधा, कोणतेही मार्गदर्शन नसताना ती तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करते याचा संघर्ष यात पाहायला मिळणार आहे. यादरम्यान येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर ती कशाप्रकारे मात करते हे देखील यात पाहायला मिळणार आहे.
ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. दरम्यान, मालिकेतील अपर्णाला कुठले मार्गदर्शन उपलब्ध नाही.पण तिचं ध्येय खूप मोठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्रॉडक्शन निर्मित असलेल्या या मालिकेत एक नवा विषय, एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, ” मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका महत्त्वकांक्षा असणाऱ्या मुलीची भूमिका करणार आहे आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका साकारणार आहे. ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल. याचा मला विश्वास आहे”, असेही शिवानीने म्हटलं. आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कसे घर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.