अखेर प्रेक्षकांच्या नाराजीने दिले उत्तर, ही लोकप्रिय मालिका होणार बंद? त्या जागी होणार नवी मालिका सुरू..
झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. गेल्या काही काळात मालिकेतील घटनांमुळे प्रेक्षक मेकर्स वर नाराज आहेत. आणि या नाराजीत आता देवमाणूस २ ही मालिका देखील सामील झाली आहे. होय, प्रेक्षक या मालिकेच्या मेकर्सवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात चाहत्यांनी आपला संतपदेखील व्यक्त केला आहे.
या मालिकेत किरण गायकवाड याने डॉक्टर अतिशय जबरदस्त भूमिका साकारली होती. किरण याने या मालिकेमध्ये देव माणूस उर्फ डॉक्टर अजित कुमार देव ही भूमिका साकारली होती. त्याचीही भूमिका प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती, तर या मालिकेमध्ये इतर भूमिका ही लोकप्रिय ठरल्या होत्या. अस्मिता देशमुख हिने देखील या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त काम केले होते.
तर या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या होत्या. ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग देखील प्रसारित करण्यात आला. साधारणत: या वर्षाच्या सुरुवातीला या मालिकेचा दुसरा भाग सुरू करण्यात आला होता. या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. मात्र, आता या मालिकेमध्ये अतिशय रटाळपणा येत असल्याने ही मालिका आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार ही मालिका लवकरच संपणार आहे अशा चर्चा आहेत. इतकाच नाही तर हा या मालिकेचा शेवट नसून तिसरा भाग येणार आहे असेही म्हटले जात आहे. या मालिकेत मार्तड जामकर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारत असून ते डॉक्टर वर भारी पडताना दिसत आहेत.
मार्तंड जामकरमूळे मालिकेचा टीआरपी सर्र्कन वाढला. आता कथानकाने वेग पकडला आहे. दरम्यान, मालिका आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आहे. डॉक्टर जामकरच्या जाळ्यात अडकणार का? की यावेळीही तो यातून बाहेर पडणार..? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे मालिकेचा शेवट किंवा नव्या पर्वाची सुरुवात. माहितीनुसार, हि मालिका संपणार असल्याचं आणखी एक कारण दिलं जातंय ते नव्या मालिकेचे आगमन. तर या मालिकेच्या जागी आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरू होणार असल्याची चर्चा देखील गेल्या काही दिवसापासून सुरू आहे, तर काहीजण ही मालिका आता दुसऱ्या वेळेस सुरू होणार असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.