पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज झाला गंभीर जखमी.. झाली मोठी दुखापत..चाहते पडले काळजीत..

0

सध्या छोट्या पडद्यावर जसा लग्नाचा सिझन चालू आहे तसाच गेल्या काही काळापासून कलाकारांच्या अपघात आणि सर्जरीचा सिझन सुरू झाला आहे. गेल्या काही काळात अनेक कलाकारांच्या सर्जरी आणि अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आणि स्टार प्रवाह’वरील वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरचा अपघात झाला आहे. ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

विजय आंदळकर हा सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असणारा लोकप्रिय कलाकार आहे. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने त्याचा अपघात झाल्याचे सांगितले आहे. यावेळी त्याने त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या हाताला जबर खरचटल्याचे दिसत आहे.

झालं असं की, विजय हा नेहमीप्रमाणे शूटींग संपवून आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाला. यात त्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या हाताला खरचटले आहे. तसेच त्याच्या शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मार लागला आहे. विजयची अपघाताची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याला काळजी व्यक्त करत त्याला आराम करायला सांगितले आहे.

या अपघातातून विजय सुखरूप बचावला असला तरी काही दिवस डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो काही दिवस मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान अभिनेता विजय आंदळकर हा पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराज या भूमिकेत दिसून येत आहे. या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना आवडत आहे. या आधी त्याने​ ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले होते.

दरम्यान तो त्याच्या लव्ह लाइफ मुळे चर्चेत येत राहतो.विजयच्या पत्नीचे नाव रुपाली झनकर असे आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी ते विवाहबंधनात अडकले होते.झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत एक काम करत असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या मालिकेत त्यांनी काजल आणि मदनची भूमिका साकारली होती. विजयने याआधी बऱ्याच मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ‘गोठ’ या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.