अयोध्येतील राम मंदिर बनवण्यासाठी केजीएफ फेम यशने दिले तब्बल ५० कोटी!

केजीएफ 2 फेम सुपरस्टार यशने या सिनेमामध्ये रॉकी भाईची दमदार भूमिका करून साउथ इंडस्ट्री सह जगभरात मोठे नाव कमावले! आता बॉलीवूडच्या चंदेरी दुनिये मध्ये देखील यश ची जबरदस्त फोन फॉलोईंग निर्माण झाली आहे आणि दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये यशची क्रेझ वाढतच जाताना दिसत आहे. अशातच
चाहते आता यशच्या येणाऱ्या आगामी सिनेमांची देखील मोठ्या उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर यशचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामागे साउथचा सुपरस्टार रॉकिंग यशने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या व्हायरल होत असलेल्या पोस्ट मागचे सत्य काही वेगळेच आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया याचे खरे कारण.

 

केजीएफ फेम सुपरस्टार यशचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसत आहे. हा फोटो पाहून तो कोणत्यातरी मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे समजते. तसेच त्याच्या कपाळावर लाल तिलक आणि खांद्यावर लाल रंगाचा रुमाल देखील आहे, त्याच्या आजूबाजूला लोकही उभे राहिलेले यात दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना एका युजरने दावा केला आहे की, यशने आयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांची देणगी दिली आहे, त्यावेळी हा फोटो त्याने काढलेला आहे. मात्र या फोटो मागची सत्यता काही वेगळीच असल्याचे समजत आहे.

मीडिया कडून आलेल्या रिपोर्ट्स नुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला यशचा हा फोटो २०२२ दरम्यानचा आहे. यश त्यावेळी तिरुपतीला दर्शनासाठी गेला असताना, हा फोटो kgf चॅप्टर 2 रिलीज होण्यापूर्वी प्रशांत नील याने क्लिक केला आहे. प्रशांत नील हे केजीएफ या सिरिजचे दिग्दर्शक आहेत.

साउथ मधील या प्रसिद्ध सुपरस्टार यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. यश हा खरंतर कन्नड चित्रपट सृष्टीतील फेमस हिरो आहे. त्याने २००० मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी तो विविध टीव्ही सिरीयल मधून देखील झळकला होता. त्यानंतर मात्र २००७ मध्ये जमदागुडूगी या सिनेमामधून त्यानी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्या काळात त्याचे एकाचवेळी अनेक चित्रपट हिट आणि अनेक चित्रपट फ्लॉप देखील ठरले! परंतु २०१८ मध्ये आलेल्या केजीएफ या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये जबरदस्त कमाई केली आणि आज यश हा अभिनेता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेला आहे!

Leave a Comment

Close Visit uttamsheti