माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रोमँटिक सीन शूट करतानाची यश-नेहाची मज्जा, सोशल मीडियावर होत आहे BTS व्हिडिओ व्हायरल!

सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे!सुरुवातीपासूनच ही मालिका यातील मुख्य कलाकारांच्या सुंदर जोडीमुळे लोकप्रिय राहिलेली! आणि आता या मालिकेत सगळ्यांना हवा असणारा ट्विस्ट आखिरीस संपन्न झाला आहे! तो म्हणजे यश आणि नेहाच लग्न! या मालिकेत यश आणि नेहा आता लग्नानंतर त्यांच्या नवीन सहजीवनाच्या नात्याची सुरुवात एकत्रितपणे करत आहेत.

 

यश आणि नेहाचा बहुचर्चित लग्न सोहळा पार पडल्यानंतर आता मालिकेमध्ये त्यांचा रोमँटिक ट्रॅक बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आणि आता त्यात पावसाच्या सुहाना मौसमची भर पडली आहे! मात्र तुम्हाला टीव्हीवर प्रोमो मध्ये दिसला तेवढा हा सीन अगदी सोप्या पद्धतीने पार पडलेला नाहीये बरं, याचं कारण म्हणजे नुकताच सोशल मीडियावर श्रेयस आणि प्रार्थनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भर पावसात हा रोमांटिक सीन कसा शूट केला गेला आणि त्यासाठी पडद्यामागे सर्व टीमला कशी मेहनत घ्यावी लागली हे सगळं या BTS व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे.

जुलैच्या या भर पावसात शूटिंग करताना कॅमेरा, साऊंड, टेक्निकल गोष्टी सांभाळण्याचा हा अवघड टास्क कसा पूर्ण झाला याचीच एक छोटीशी झलक या व्हिडिओच्या माध्यमातून मालिकेच्या चाहत्यांना दिसत आहे. विशेष म्हणजे यात श्रेयस आणि प्रार्थना देखील त्यांचा सीन संपल्यानंतर त्यांचा मान्सून ब्रेक अगदी मनसोक्तपणे एन्जॉय करताना दिसत आहेत. या सिरीयलच्या चाहत्यांनी संपूर्ण ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या टीमची सगळी धावपळ पाहून या व्हिडिओवर कौतुकभरल्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

या मालिकेमध्ये आता दोघांचा लग्नानंतरचा रोमँटिक ट्रॅक जरी सुरू झाला असला तरी अनेकदा यात देखील त्यांची छोटी छोटी चहाची वादळ होत आहेत, प्रार्थनाचे सध्याचे लग्नानंतरचे भन्नाट लुक्स प्रेक्षकांना तिच्या आणखीनच प्रेमात पाडत आहेत! संपूर्ण छोट्या पडद्यावर तिच्या साड्या तिचे मंगळसूत्र या सगळ्यांची चर्चा रंगलेली आहे. त्यातच लग्नानंतर प्रार्थनाच्या लुक्समध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत असल्याचं तिचा चाहत्यांचा म्हणणं आहे आणि एकंदरीत प्रार्थनाचा सुंदर लूक पाहता हे १००% खरं वाटत आहे!

Leave a Comment

Close Visit Np online