छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीच्या घरी येणार नवा पाहुणा…डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

0

सध्या बॉलीवुडमध्ये गुड न्युज देण्याचा जणू ट्रेंडच चालू आहे. आलीय रणबीर, बिपाशा करण, सोनम आनंद या जोडप्याने सर्व चाहत्यांना यावर्षी खुशखबर सुनावली. हाच ट्रेंड आता छोट्या पडद्यावरही दिसून येत आहे. छोटया पडद्यावर कार्यरत असणाऱ्या अभिनेत्री नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकण्यात पटाईत ठरल्या आहेत. तर आता एका अभिनेत्रीने चक्क गुड न्युज देत चाहत्यांना खुश केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे रूपाली झंकार. रुपालीने गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा जणू पाऊसच पाडला आहे.

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. आणि हाच क्षण रूपाली सध्या अनुभवत आहे रादर खूप एन्जॉयदेखील करत आहे. दरम्यान सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. रूपालीचं डोहाळे जेवण नुकतंच पार पडलं. या दरम्यानचा फोटो आणि व्हिडीओ तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हे फोटो व्हायरल होताना दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Arun Andalkar (@vijayandalkar)

सोबतच या फोटोत रुपालीच्या चेहऱ्यावर प्रेग्रेंन्सी ग्लो रुपालीच्या झळकतो आहे. तर काही फोटोंमध्ये तिचा पती देखील खुलून फोटोज् काढतांना दिसून आला आहे. या फोटोज् वरून तुम्हाला कळालेच असेल की रुपालीचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. सध्या तो ‘पिंकीचा विजय असो’मालिकेत युवराजची मुख्य भूमिका साकारतो आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली लवकरच आईबाबा होणार आहेत. विजय आणि रुपाली दोघेही बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by rupalizankar-Andalkar (@rupalizankar)

रुपाली आणि विजयची भेट झी मराठीवरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ या मालिकेच्या सेटवर झाली. यात रुपालीनं काजोलची तर विजयनं मदनची भूमिका साकरली होती. मेहंदी, हळदीचे फोटो रूपालीने व विजयने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रुपालीने लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेत काजलची भूमिका निभावली होती.

मालिकेनिमित्त हे सर्व कलाकार नाशिकलाच काही काळ एकत्रित राहिले होते. त्यानंतर २१ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी एंगेजमेंट करून चाहत्यांना धक्का दिला होता.

विजय आंदळकरने वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपट आणि मालिकेतून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता. बहुतेक चित्रपट आणि मालिकेतून तो नकारात्मक भूमिका देखील साकारताना दिसला आहे.रुपाली ही मूळची नाशिकची आहे. फॅशन जगतात रुपालीने अनेक नवख्या कलाकारांना संधी मिळवून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.