पेट्रोल पंपवर काम करून सांभाळायची घर, आज आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..

मित्रहो मुली खूप विचार करतात, त्यांच्या भविष्याची त्यांना नेहमीच काळजी असते. हल्ली मुली उंबरठ्याबाहेर पडून अनेक क्षेत्रात कार्यरत होत आहेत. त्यांच्या धाडसीपणाचे कौतुक करावे तितके कमी असते. अलीकडे एक अभिनेत्री याच कारणामुळे विशेष चर्चेत आली आहे. तिने खूप मेहनत करून आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती सुधारण्यात हातभार लावला आहे. तिची ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे, घरची आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून ती पेट्रोल पंपवर काम करत होती. ही अभिनेत्री आहे सिया पाटील. सियाच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत, तिने पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

 

सियाने मुंबई चांदवली येथे “गावकरी” नावाचे हॉटेल सुरू केले आहे. अनेक रसिक मंडळी तिच्या या हॉटेलला नेहमीच भेट देत असतात. सिया मराठी कलाविश्वात चांगलीच यशस्वी झाली आहे, तिने आजवर अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केले आहे. पडद्यावर अनेकदा ती अतरंगी भूमिकेतून झळकली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेत ती अतिशय लक्षवेधी दिसली आहे, म्हणून तर प्रेक्षक आजदेखील तिच्या भूमिका मनापासून पाहतात. कधी विनोदी तर कधी कुटुंबातील लाडक्या लेकीची भूमिका साकारून तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siya Vimal Shankar (@siyaapatilofficial)

सिया आता भरपूर प्रमाणात लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे, पण इथवर येण्याचा तिचा प्रवास सोप्पा न्हवता. तिने खूप मेहनत घेतली आहे, सिया मूळची सांगलीची आहे. अटपनी तालुका येथील राजेवाडी हे तिचे गाव आहे. सियाचे वडील शंकरराव पाटील हे द्राक्ष बागायतदार होते. सोबतच साखर कारखान्याचे संचालक देखील होते. २०१० साली त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. वडिलांचे निधन झाल्यावर सियावर आणि तिच्या कुटुंबावर खूप वाईट स्थिती निर्माण झाली होती. त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.

मात्र अशा परिस्थितीत देखील सियाने आपले पाऊल मागे घेतले नाही. तिने यावेळी देखील खंबीरपणे विचार केला, कोणाचीही आर्थिक मदत तिने घेतली नाही. तिने स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी पैशांचे नियोजन करायला सुरुवात केली. तिची मेहनती वृत्ती तिला नेहमीच यशस्वी बनवत आली आहे, रोज संध्याकाळी अवघे दोन तास ती पेट्रोल पंपवर काम करायची. इतकेच नव्हे तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील घ्यायची. तसेच एक अकाउंटट म्हणून देखील तिने काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siya Vimal Shankar (@siyaapatilofficial)

इतक्या मेहनतीतून तिने आपले लक्ष साध्य केले आहे, आज ती मराठी चित्रपट सृष्टीतील यशस्वी, लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोबतच एक यशस्वी बिजनेस वुमन म्हणून देखील तिची सर्वत्र खास ओळख आहे. सिया पाटील हिने अनेक हलाखीचे दिवस पाहिले असून गैरबी व त्यातून मिळणाऱ्या झळा यांच्या बद्दल ती अधिक जाणतेच. मात्र तिला मिळालेले यश आणि लोकप्रियता नेहमी असेच राहो, प्रत्येक वेळी तिला आणखी लोकप्रियता मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti