अनघा आणि अभिषेकच्या नात्यात येणार का दुरावा..? आई कुठे काय करते मालिकेत येणार मोठा ट्विस्ट..
स्टार प्रवाह वाहिनीवरील’आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या भरपूर प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील आई आज घराघरात पोहोचली आहे. आणि मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या अगदी जवळच बनलं आहे. दिवसेंदिवस अरूंधती च्या अडचणीत भर पडताना दिसते आहे. सध्या या
मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.दरम्यानच्या काळात मालिकेत सगळं काही सुरळीत झालं होतं. यशची जेलमधून सुटका झाल्यावर आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. सगळे टेन्शन फ्री झाले होते.
यश नीलच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. पण अरुंधतीने त्याची निर्दोष सुटका केली आणि त्याला जेलमधून सुखरूप घरी आणलं. पण आता परत अरुंधती समोर एक नवं संकट आणि नवं टेन्शन उभं राहत आहे. ते म्हणजे तिचा दुसरा मुलगा अभिषेकबद्दल आहे. आता मालिकेत अरूंधती आणि अभिषेक यांच्या नात्यात नाराजी निर्माण होणार आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या नवा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार देशमुखांच्या घरी सगळेजण आनंदात यशचा वाढदिवस साजरा करत आहेत. देशमुख कुटुंबातले सगळे जण या आनंदात सामील झाले आहेत. आशुतोष आणि नितीनही तेथे आलेले आहेत. तेवढ्यात अभिषेक संतापात घरात येतो. घरात येताच तो अनघाच्या अंगावर ओरडतो. ‘अनघा तुला चेकअपला यायला सांगितलं होतं ना, ते न करता तू या असंस्कारी माणसाचा वाढदिवस साजरा करतीयस…,’ असं तो म्हणतो. त्याचे हे शब्द ऐकून अरूंधती संतापते. ‘अभिषेक तू आता जे करतोयस तेही आमचे संस्कार नाहीत,’ असं ती अभिषेकला बरेच खडेबोल सुनावते. त्यानंतर अभिषेक अरुंधतीला तू स्वार्थी आहेस म्हणत, अनघाचा हात धरत आपण घर सोडून जाऊ असे म्हणतो. पण अनघा त्याच्यासोबत जाण्यास नकार देते आणि ‘मी माझ्या बाळाला याच घरात, याच संस्कारात वाढवणार आहे,’ असं त्याला स्पष्ट सांगते.
तिच्या या बोलण्यावर संतापून तो बॅग भरून निघत असतो इतक्यात यश त्याला विनवणी करतो पण अनघा त्याला थांबवते. त्यामुळे या तणावपूर्ण वातावरणात अनघाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनघा आणि अभिषेक यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अरूंधती या नव्या संकटाला कशी सामोरी जाते, अभिषेकला कशी समजावते? अभिषेक देशमुखांचं घर सोडून जातो की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.