सध्या बॉलीवूड मध्ये सेलिब्रिटींचे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वर्षानुवर्षे सोबत असलेले सेलिब्रिटी अचानकपणे घटस्फोट घेऊन विभक्त होतात आणि याचा थोडा फार परिणाम त्यांच्या चाहत्यांवर ही होतोच. दरम्यान, धनुष – ऐश्वर्या, सोहेल खान-सीमा, नागार्जुन -समंथा या काही फेमस जोड्या विभक्त झाल्याने चाहते नाराज झाले होते. आणि आता बॉलीवूड च्या किंग खान अर्थात शाहरुख खानच्या घटफोटाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, कॉफी विथ करण या शो दरम्यान, करण जोहरने गौरी खानला प्रश्न केला की, शाहरुखला इतर महिलांकडून एवढं अटेंन्शन मिळतंय हे पाहून तिला असुरक्षित वाटत नाही का? गौरीने या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की, तिला हा प्रश्न अनेकदा विचारलं जात असल्याने ती याला कंटाळली आहे.
गौरी खान यावर म्हणाली की, जेव्हा कोणी मला हा प्रश्न विचारतं तेव्हा मला राग येतो. मी दररोज देवाकडे प्रार्थना करते की, जर आपल्याला एकत्र राहावसं वाटत नसेल आणि त्याला दुस-यासोबत कोणासोबत राहायचं असेल, तर देवा मला दुसऱ्याला शोधू दे, मला आशा आहे की, तो सुंदर आहे, हे खरं आहे! हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. मला वाटतं, जर त्याला दुसऱ्या कुणासोबत राहावसं वाटत असेल, तर मी त्याच्यासोबत राहणार नाही. मी म्हणेन, छान, मस्त! मी देखील कोणासोबत माझ्या आयुष्यात पुढे जाईन.”
ही बातमी ऐकून साहजिक तुम्हाला धक्का बसला असेल, पण गौरीची ही मुलाखत फार जुनी आहे.गौरीने हे वक्तव्य 2005 मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केलं होतं. यादरम्यान ती सुजैन खानसोबत शोमध्ये आली होती. आणि ही क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यामुळे अजिबात काळजी करण्याचे कारण नाहीये.
शाहरुख खान आणि गौरी दोघंही सुखानं संसार करत आहेत. अनेक अडथळ्यांना पार करत हिंदू मुस्लिम वाद, घरच्यांचा विरोध आणि घडत असलेलं नशीब यांची सांगड घालत त्यांनी लव्ह मॅरेज केलं. त्यामुळे त्यांचं प्रेम सहजासहजी संपू शकत नाही.
अनेकदा शाहरुख आपल्या लव्ह लाईफ बद्दल बोलताना गौरीचे कौतुक करायला विसरत नाही. ते दोघंही बॉलिूडमधील एक आयडियल कपल आहेत. एकमेकांच्या पडत्या काळात सपोर्ट करत त्यांनी हे यशाचा शिखर गाठलं आहे. ते आजही एकत्र आहेत आणि चाहत्यांनाही या जोडीला कायमचं एकत्र पाहायचं आहे. आणि शाहरुख खान आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही हे तर जगजाहीर आहे.