अभी करणार का अरूंधतीला बाळापासून दूर..? आई कुठे काय करते मालिकेत आला मोठा ट्विस्ट..

0

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राची आपली अशी एक जागा प्रेक्षकांच्या मनात आहे. ही मालिका जरी आईवर केंद्रित आहे , तरीही मालिकेत आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची जवळीक वाढताना पहायला मिळत आहे. सोबतच मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

मालिकेत अभिषेकने अनघाशी दुर्वाव्यहार केल्याने मालिकेला आता वेगळंच वळण लागलं आहे. अनघा या सगळ्याला कशी सामोरी जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील पुढच्या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

याआधी मालिकेत दाखवल्याप्रमाणे अनघा डोहाळ जेवणात चक्कर येऊन पडते. ती अत्यवस्थ झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले जाते. अनघाच्या गरोदरपणात आधीपासूनच कॉम्प्लिकेशन होते. त्यात घडल्या प्रकारामुळे तिची प्रकृती अधिक खळवते.

सध्या मालिकेत अभिचे सत्य सर्वांसमोर आलं आहे. अनघाच्या डोहाळजेवनात अरुंधतीने सगळ्यांसमोर अभीचा खोटेपणा उघड केला. ते ऐकून घरच्यांसहितच अनघाला खुप मोठा धक्का बसला होता. ती बेशुद्ध झाली होती. अनघाच्या गरोदरपणात आधीपासूनच कॉम्प्लिकेशन होते. त्यात अरुंधतीच्या खुलाशाने तिला ताबडतोब इस्पितळात न्यावं लागलं. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, अनघाची प्रकृती आणखी बिघडणार का, तिचं बाळ सुखरूप असेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. पण आता मालिकेच्या पुढच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अनघाच्या या अवस्थेला स्वतः अभिषेक जबाबदार असला तरी त्याचे बिंग फोडल्याने आईच जबाबदार असल्याचे तो मानतो अनई आईला दोषही देतो. ज्या आईने एकेकाळी अभिला संकटातून वाचवलं तोच अभि आज आईचा अपमान करताना दिसणार आहे.

प्रोमोनुसार अभि आणि अनघाला गोंडस अशी मुलगी झाली आहे. तिच्या रूपाने आता देशमुखांच्या घरात लक्ष्मी आली आहे. तिच्या येण्याने सगळेच खुश आहेत. आणि अनघादेखील सुखरूप आहे. दरम्यान,अरुंधती अनघा आणि बाळाचं देशमुखांच्या घरात स्वागत करणार आहे. अरुंधती बाळाची दृष्ट काढत असते तेव्हा अभि तिला रोखतो. जिची दृष्ट लागते तिनेच दृष्ट कशाला काढायची असं म्हणतो. पण अनघा अरुंधतीला पाठींबा देते आणि बाळाला तिच्याकडे सोपवते.

सध्या तरी आता बाळाच्या येण्याने मालिकेत आनंदी ट्रॅक असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी अभिचा विषय मागे पडत चालला आहे. पण आगामी भागात काय होईल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.