घटस्फोटाच्या पोस्ट नंतर का तरळले मानसीच्या डोळ्यात अश्रू…VIDEO व्हायरल

0

वाट माझी बघतोय रिक्षावाला म्हणत साऱ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारी अभिनेत्री मानसी नाईक मागच्या काही काळापासून तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तर झालंय असं की मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात आता काहीच बरोबर नसून नसून दोघे घटस्फोट घेत आहेत. मानसी नाईकने गेल्या काही दिवसातच याबाबत खुलासा केला आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

मानसी आणि प्रदीप यांनी मागच्याच वर्षी लग्न केलं. आणि लग्नाच्या दीड वर्षातच त्यांचे हे नाते संपुष्टात येत आहे. लग्ना नंतर बऱ्याच वेळा मानसीने दोघांचे खास क्षण रिल्स व्हिडीओ माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर केले. पण आता घटस्फोटांनंतर दोघांच्या पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत.

घटस्फोटांच्या चर्चांनंतर मानसी नाईकच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. आता यानंतर मानसीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती चक्क रडताना दिसतेय. व्हिडिओत मानसी म्हणतेय कि, ”यहाँ से बहोत दूर….गलत और सही के पार एक मैदान है… वहा मिलूंगी तुझे” असं म्हणत मानसीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिला धीर देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा गेल्या वर्षीच म्हणजे २०२१मध्ये जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. त्यापूर्वीही ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते. आता लग्नानंतर वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतल्यानं अनेक चर्चा होत आहेत.

घटस्फोटांच्या चर्चांवर मानसी नाईकनं म्हटलंय, हो घटस्फोटांच्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोट बोलणार नाही. मी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला आहे. या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दु:खी आहे. यासगळ्यात नेमकं काय चुकलंय हे सांगणं आता माझ्यासाठी खूप कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठिक होऊ शकल्या नाहीत. हे सगळं खूप वेगात घडलंय. पण मला माझ्या प्रेमावर आजही विश्वास आहे.

प्रदीपवर गंभीर आरोप करत मानसी म्हणाली की, काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतातात. असंच काही तरी माझ्यासोबत झालं. तसंच ती म्हणाली, सध्या यावर जास्त बोलता येणार नाही, पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लवकरच सर्वांसमोर आणायच्या आहेत असंही मानसीनं स्पष्ट केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप