विनोदापासून दूर का? मकरंद अनासपुरे यांचे उत्तर ऐकून व्हाल हैराण..
मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेमातील गाजलेलच नाही तर नावाजलेले आणि आपलुकीच नाव आहे. कित्येक मराठी सिने प्रेमींच्या मनात त्यांनी अढळ असे स्थान मिळवले आहे. गांवढळ पण अस्सल मराठी बाण्यात बोलून मक्या म्हणून त्यांची ओळख सर्वत्र लोकप्रिय आहे. आणि आता तब्बल सात ते आठ वर्षानंतर ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
इतक्या गॅपनंतर त्यांनी दमदार पद्धतीने पदार्पण करण्यासाठी कंबर कसलेली आहे. आणि त्यामुळेच त्यांचे चाहते देखील उत्सुक तर आहेतच शिवाय खूप खुश देखील आहेत. कारण मराठीतील कॉमेडी सिनेमा आणि मकरंद अनासुरे हे समीकरण फार जुने आहे. पण काही वर्षांूर्वी त्यांनी मोठ्या पडद्यावरून सुट्टी घेतली. त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांना खूपच मिस करत होते. पण आता ती कमी भरून निघणार आहे. दे धक्का २ च्या निमित्ताने विनोदाचं हे वादळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे हे नक्की.
दरम्यान, एका मुलाखती दरम्यान त्यांना तुम्ही आता विनोदी भूमिका रुपेरी पडद्यावर साकारताना दिसत नाही. यामागचं कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला.यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.मकरंद म्हणाले, “एका टप्प्यावर प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो. तसेच स्वतःलाही आपल्याच भूमिकांचा कंटाळा येतो. अशी अवस्था नटाच्या आयुष्यामध्ये मग अशावेळी काही काळ थांबायचं असतं. मध्यंतरीच्या काळामध्ये मी आमच्या नाम फाऊंडेशनच्या कामामध्ये रमलो होतो. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर माझा ‘दे धक्का २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.”
सात ते आठ वर्षानंतर पुन्हा स्वतःला शोधणं ही नवी गंमत असते. त्यामुळे आता विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका मी साकारत आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना आपल्याला मी पुन्हा येईन असं म्हणावंच लागतं.” दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मवर हाहाकार माजवलेल्या ‘रानबाजार’ सारख्या वेबसीरिजमध्येही मकरंद अनासपुरे यांनी अफलातून काम केलं आहे. कॉमेडी करणारा नट गंभीर भूमिका बजावतो तेव्हा धुमाकूळच घालतो हे त्यांनी सिद्ध केलं.
अभिनयासोबतच ते सामाजिक कार्यात देखील पुढे असतात. मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात. आता ते मोठ्या पडद्यावर परतल्याने सर्वानाच आनंद झाला आहे. त्यामुळे दे धक्का २ या सिनेमात त्यांना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.