७.६ कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल-कार, सोन्याने मढलेले नक्की कोण आहेत हे गोल्डन गाईज..?

0

आजवर आपण महिलांना सोन्याचे दागिने परिधान करताना , विकत घेताना पाहिले आहे. अनेकदा तर यावर जोक्स ही ऐकले आहेत. पण कोणा पुरुषाला सोने घालण्याचा शौक असू शकतो यावर विश्वास बसणे थोडे कठीण आहे नाही? पण असे काही बहाद्दर आहेत ज्यांना सोने परिधान करायला खूप आवडते. कोण आहेत ते चला जाणून घ्या .

छोटया पडद्यावर बिग बॉस १६’ हा शो सर्वात लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. दरम्यान, या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणाऱ्या सनीचे पूर्ण नाव सनी नानासाहेब वाघचौरे आहे आणि बंटीचे पूर्ण नाव संजय (बंटी) गुर्जर आहे. सनी आणि बंटी खूप चांगले मित्र आहेत, तसेच ते अनेक ठिकाणी एकत्र जातात. सनी आणि बंटी हे फिल्म फायनान्सर आणि निर्माते आहेत.

त्यांना त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शौक बद्दल विचारले असता ते सांगतात.“आम्ही दोघे पुण्याचे रहिवासी आहोत. मी आणि बंटी लहानपणापासून एकत्र आहोत आणि आम्हा दोघांनाही लहानपणापासूनच सोने घालण्याची आवड आहे. आम्ही मित्र असू शकतो पण आमच्यात भावासारखं प्रेमदेखील आहे. आम्ही नेहमी एकत्र राहतो. आमच्यातील असलेल्या प्रेमापोटी लोकांनी आम्हाला ‘गोल्डन गाईज’ हे नाव दिलेय.”

यापुढे सनीने सांगितले की, “लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की मी इतके सोने कसे घालतो. म्हणून मी सांगू इच्छितो की जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे काम करत असाल तर तुम्हाला त्याची सवय होते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जीममध्ये व्यायाम करण्यासाठी जात असेल आणि तो १०० किलो वजन उचलत असेल, तर त्याला पाहून नवीन लोक म्हणतील की तो इतका वजन कसा उचलतोय? मग तोच माणूस हळूहळू सराव करेल तेव्हा तो स्वतः १०० किलो वजन उचलू शकेल. तसंच मीही लहानपणापासून सोनं घातलं आहे. कालांतराने मी सोन्याच्या दागिन्यांचे वजन वाढवले. आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्याने यावर भाष्य केले.

मी आज जवळपास सात किलो सोनं घालतो आणि बंटी चार पाच किलो सोनं घालतो. तुम्हाला ऐकायला अजब वाटेल की इतकं वजन घेऊन कोणी कसं चालू शकतं. पण त्यात कोणतीही समस्या येत नसल्याचं सनीनं सांगितलंगोल्डन गाईजकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवर अनेकवेळा त्यांची सोन्याची चमकणारी कार पाहण्यासाठी गर्दी होते. त्यांच्या गाडीसोबत अंगरक्षकांची दोन वाहनेही आहेत. त्याच्याकडे जग्वार एक्सएफ कारही आ१००हे. त्याच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे ८९ लाख आहे. कारच्या बॉडीशिवाय टायर आणि इंटिरिअरही सोन्याच्या मिश्रीत धातूपासून बनवलेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.