बॉलीवुड मध्ये आपल्या वयाच्या अंतरामुळे प्रचलित आणि ट्रोल होत असलेलं कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. ती त्याच्यापेक्षा मोठी असली तरी त्यांच्या प्रेमात कधीच ही गोष्ट येत नाही असं वारंवार त्या दोघांनी सांगितले आहे. दरम्यान, बॉलीवुड मधील क्यूट कपल आलिया आणि रणबीर कपूर नंतर हे हॉट कपल केव्हा लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष आहे. तसा प्रश्न ही त्यांना करण्यात आला. यावर मलयकाचे उत्तर ऐकून तुम्ही अवाक व्हाल.
मलायका आणि अर्जुन अनेकदा सोबत स्पॉट झाले आहेत. आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. यामुळेच त्यांच्या अनेक चाहते आहेत. त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा विचारण्यात आले आहे. दरम्यान, एका मुलाखतीत मलायकाला हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला की, ती अर्जुन कपूरसोबत कधी लग्न करणार?
लग्नाच्या प्रश्नावर मलायकाचे उत्तर होते, “लग्न ही आयुष्यात घडणारी सुंदर घटना आहे. मला वाटतं की, कुणीही लग्नासाठी घाई करू नये, कारण तो एक सामाजिक दबाव आहे. कधीकधी पालक तुमच्यावर जबरदस्ती करतात. म्हणून योग्य कारणांसाठी लग्न करा. तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तर ते जगातील सर्वांत सुंदर नातं आहे. जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा मला असेच वाटते की, मी आत्ताच त्याचे उत्तर देऊ शकणार नाही.’
त्यानंतर बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “अर्जुनसोबत माझे फक्त चांगले संबंध नाहीत, तर तो माझा चांगला मित्रही आहे. आपल्या जिवलग मित्रावर प्रेम करणे आणि प्रेमात पडणे महत्वाचे आहे. अर्जुन मला खूप चांगला समजतो. मला वाटते की आम्ही दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहोत. मी अर्जुनशी काहीही बोलू शकते. रिलेशनशिपमध्ये असण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जसे आहात तसे राहू शकता आणि मी जशी आहे तसे अर्जुनसोबत जगू शकते.”
दरम्यान, अर्जुन एकदा कॉफी विथ करण शो.मध्ये दाखल झाला होता त्यावेळी तो लग्नाबद्दल ती म्हणाला की, खरे सांगायचे तर दोन वर्षे लॉकडाऊन होते, मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. मी कुठे पोहोचतोय ते बघायचे आहे. मला व्यावसायिकदृष्ट्या अधिक स्थिर व्हायचे आहे. मला अशा प्रकारचे काम करायचे आहे, ज्यामुळे मला आनंद होतो. कारण मी आनंदी असेल तर मी माझ्या जोडीदारालाही आनंदी ठेवेन. मला माझ्या कामातून खूप आनंद मिळतो असे वाटते.