जेव्हा संकर्षणचा भाऊ यश अर्थात श्रेयसला भेटतो..

0

आजवर आपण बॉलीवुड मध्ये भाऊ बहिणींच्या यशस्वी जोड्या कार्यरत असलेल्या पाहिल्या आहेत. खान ब्रदर्स , कपूर सिस्टर्स याचं जिवंत उदाहरण आहेत. पण छोट्या पडद्यावर पण आज अशीच एक भावांची जोडी लोकप्रिय ठरत आहे. पण काही जणांना हे माहीतच नाही की ते भाऊ आहेत. कोण आहेत ते ठाऊक आहे का? ते आहेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अधोक्षज कऱ्हाडे..

संकर्षणने आजवर आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षणने छोटया पडद्यावर भारदस्त अभिनयाचा नमुना दाखवत नाव कमावले आहे. आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत संकर्षणचा धाकटा भाऊ अधोक्षज हा देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाला. मालिका, नाटकातून तो हळूहळू आपला जम बसवताना दिसतो आहे.

नुकतीच अधोक्षजने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. अर्थात त्याला कारणही तेवढंच खास होतं. आपला भाऊ ज्या मालिकेत काम करतो त्याच मालिकेत त्याचा आवडता अभिनेताही काम करतो हे त्याच्यासाठी खूप खास ठरले.

अधोक्षज हा श्रेयस तळपदेचा खूप मोठा चाहता आहे.आणि याच निमित्ताने त्याने मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी श्रेयसला पाहून आपल्या भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केल्या. यावेळी त्याने बाबांच्याही आठवणींचा खजिना उलगडला. अधोक्षज म्हणाला की, २००५ साल. मी नुकताच नववी पास करून दहावीच्या वर्गात गेलो होतो. तेव्हा बाबा बँकेत काम करत करत प्रायोगिक नाटकात आणि कधीकधी मराठी पिक्चरमध्ये काम करायचे. मला आठवतंय, एकदा बाबा रजा घेऊन आठ दिवसां…

तो पुढे म्हणाला की, तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्या आशाये गाण्यानं होते. नंतरही त्याचं प्रत्येक काम मी मन लावून पाहिले. माझ्या बाबांनी इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम केले हे फिलिंग खूप भारी होते. मला पण कधीतरी त्याला भेटता यावं अशी इच्छा तेंव्हापासून मनामध्ये होती. ‘इक्बाल’नंतर मात्र तो हिंदी चित्रपटसृष्टीतच जास्त कार्यरत राहिला आणि अनेक वर्षं त्याला भेटण्याची इच्छा फक्त इच्छाच राहिली.

मग अखेर पंधरा वर्षांनंतर, संकर्षणच्या निमित्तानं, ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर ‘दि श्रेयस तळपदे’च्या भेटीचा योग आला. त्याची रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्याची स्माईल आणि त्याचा साधेपणा याचं कॉम्बिनेशन पाहून मला खूप छान वाटले आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरला नाही. ही त्याची आणि माझी पहिली भेट.

पुढे आमच्या घरगुती समारंभाचा भाग होण्याइतका तो जवळचा झाला आणि पर्यायाने ‘दि श्रेयस तळपदे’चा ‘श्रेयस दादा’ झाला. भविष्यात त्याच्यासोबत कामं करण्याचीही संधी मिळेल, या ‘आशाये’ आहेतच, पण ही भेट खूप खास होती, हे मात्र खरं! Love you श्रेयस दादा अशीच मस्त मस्त कामं करत रहा. अशीच प्रेरणा देृत रहा!

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप