मागच्याच आठवड्यात जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला गेला. यावेळी विविध प्लॅटफॉर्म वर अनेकांनी पुरुषांना या खास दिवशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कविता, लेख शायरी, ब्लॉग्ज अशा अनेक गोष्टींमधून पुरुषाचं महत्व आणि ते कसे खास आहेत हे सांगितले गेले. तस पाहता पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
या निमित्ताने अनेक सेलिब्रेटीनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत हा दिवस साजरा केला. दरम्यान, मागील काही दिवसात चर्चेत असणारी अभिनेत्री मानसी नाईकने या निगडित एक पोस्ट शेअर आहे, ज्यामुळे ती चर्चेत आणखी आली आहे.
अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे सुंदर आणि बोल्ड फोटोज् शेयर करून चाहत्यांचे मन हेरत असते. अलीकडेच तिने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहे. यासोबत तिने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, “मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता ती क्षमता गमावण्याची भिती नसेल.” तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मानसी नाईक ही एक मॉडेल आणि अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त, ती एक चांगली डान्सर देखील आहे. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्याने तिला सिने इंडस्ट्री मध्ये ओळख मिळवून दिली तर ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांने तिने लोकप्रियता मिळवली. ती तिच्या जोरदार अभिनयासाठी चांगली ओळखली जाते. मानसीला मराठी चित्रपटांची डान्सिंग क्वीन देखील म्हटले जाते. मराठी चित्रपटांमध्ये तिचा डान्स मुळे दबदबा आहे म्हट ले तर गैर ठरणार नाही.
तिने ई टीव्ही मराठी या दूरचित्र वाहिनीवरून प्रसारित होणार्या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिकेमुळे ती विशेष गाजली.त्यानंतर २००७ मध्ये जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. तिला छोट्या पडद्याच्या दुनियेतून ढोलकीच्या तालावर नावाच्या टीव्ही सीरियलची ऑफर मिळाली आणि त्यानंतर इतरांनी हल्ला बोल आणि मराठी तारका म्हटले.
मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.सोबतच तिने ‘एकता – एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ यांसारख्या चित्रपटात उल्लेखनीय काम त काम केले आहे.