आशिया चषक स्पर्धेत भारत आणि नेपाळ (IND vs NEP) यांच्यात या स्पर्धेतील 5 वा सामना खेळला गेला. श्रीलंकेतील पल्लेकेले मैदानावर झालेल्या या सामन्यात नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात 230 धावा काढण्यात यश मिळविले.
बाद फेरीत नेपाळने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि टीम इंडियाला 23 षटकांत 145 धावांचे लक्ष्य मिळाले. याला प्रत्युत्तरात टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.
या शानदार विजयासह टीम इंडिया सुपर 4 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. त्याचबरोबर नेपाळविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि टीम इंडियाला 1 गुणावर समाधान मानावे लागले. मात्र नेपाळला हरवून सुपर 4 मध्ये स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी या संघाला होती आणि संघाने कोणतीही चूक न करता नेपाळचा पराभव करत सुपर 4 मध्ये स्थान मिळवले.
नेपाळविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू खूप आनंदी दिसत होते आणि त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माही खूप आनंदी दिसत होता. टीम इंडिया पहिल्यांदाच नेपाळविरुद्ध सामना खेळत होती आणि टीमने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला आणि आशिया चषकात आपली मोहीम पुढे नेली.
आशिया चषक स्पर्धेतील पाचव्या सामन्यात भारत आणि नेपाळ यांच्यात पावसामुळे संपूर्ण ५० षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे टीम इंडियाला 23 ओव्हरमध्ये 145 रन्सचं टार्गेट मिळाले, त्याला प्रत्युत्तरात टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार इनिंग खेळून टीमला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला.
पावसानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा संघाच्या सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 20.1 षटकांत सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने नाबाद ७४ धावांची आणि शुभमन गिलने ६७ धावांची नाबाद खेळी खेळली. या विजयासह टीम इंडिया आणि पाकिस्तान आता ग्रुप ए मधून सुपर 4 मध्ये पोहोचले आहेत.