लग्नाआधीच गरोदर होती का आलिया? बहीण शाहीन भटच्या उत्तराने नेटकरी झाले हैराण..

0

मॉम टू बी आलिया म्हणजेच आपली लाडकी चुलबुली बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. एप्रिल महिन्यात अभिनेता रणबीर कपूर आणि आलियाने अगदी गुपचूप घरच्याघरीच लग्न रचले. त्यानंतर जून महिन्यात आलिया-रणबीरने आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली. लग्नानंतर दोन महिन्यातच आलिया-रणबीरणे गूड न्यूज दिल्यामुळे आलिया लग्नाआधीच गरोदर होती का?, अशी चर्चा रंगली होती.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले होते, हे समजल्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. लोकांनी तर लग्नाआधीच आलिया भट प्रेग्नंट असल्याचं म्हटलं होतं. आता आलिया भटची बहीण शाहीन भटने एका मुलाखतीत या सर्व गोष्टींबद्दल बरेच काही सांगितले आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कपूर कुटुंबियांसह तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला होता. परंतु यावरुन आलिया-रणबीरला ट्रोलही करण्यात आलं होतं. आता आलियाची बहीण शालीन भट्टने यावर भाष्य केलं आहे. आलिया-रणबीरला ट्रोल करणाऱ्यानांबद्दलही तिने तिचं व्यक्त केलं आहे.

शाहीन भट्टने नुकतीच न्यूज १८ला मुलाखत दिली. ती म्हणाली, “आलियाबद्दल मी बोलणार नाही. हे तिचं आयुष्य आहे. आलियाच्या गरोदरपणामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर काही निराशाजनक, ट्रोल करणाऱ्या कमेंट असतात. परंतु, कोणत्या कमेंटकडे लक्ष द्यायचं आणि कशावर नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.

पुढे ती म्हणाली, “हे वर्ष आम्हा सगळ्यांसाठीच खूप चांगलं गेलं आहे. आता आलियाच्या बाळामुळे आमच्या आयुष्यात आणखी आनंद येणार आहे. यासाठी मीदेखील उत्सुक आहे”. दरम्यान, आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहीन भटच्या या उत्तरानंतर ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट करण जोहरच्या रॉकी आणि रानी की लव्हस्टोरी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय रणवीर सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान या बाबत करण जोहरने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. “टॉकी रॅप” म्हणत त्याने रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासह संपूर्ण आणि कलाकार आणि क्रू यांच्या उपस्थितीत शूटिंगवर पडदा खाली आणला. डार्लिंग्सचे प्रमोशन करत असलेली आलिया भट्ट व्हिडिओ कॉलद्वारे सामील झाली.केक कापत असताना त्याने आपल्या टीमसोबत विशेषतः धर्मेंद्रचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप