विशाखा सुभेदारचं महाराष्ट्राची हास्य जत्रा शो सोडण्याचे खरे कारण आले समोर.. म्हणाली.. “कधी कधी वाटायचं की मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलते आहे.”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा समावेश होते. गेल्या चार वर्षांपासून विशाखा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होती. परंतु आता ती नसल्यानं तिची उणीव प्रेक्षकांना भासत आहे.
तिनं हा कार्यक्रम सोडला असून तिला प्रेक्षक नक्कीच मिस करणार आहेत. परंतु आगामी पर्वामध्ये नव्या दमाचे कलाकार प्रेक्षकांना हसवण्यासाठी येत आहेत. विशाखा हास्यजत्रेच्या नव्या पर्वात का नसणार याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनं ई-टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये केला आहे.
खरं तर विशाखानं गेलं पर्व संपण्याआधीच काही दिवस कार्यक्रमातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. कार्यक्रम सोडण्यामागे नवीन काही तरी करून पाहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं होतं. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये विशाखानं सांगितलं की, ‘खरं तर जेव्हा मी कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला कोणतीही मोठी भूमिका अथवा मोठा सिनेमा मिळालेला नव्हता.
View this post on Instagram
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम सोडण्यासारखं काहीही घडलं नाही. खरं तर मला काही तरी नवीन गोष्टी करून पाहायच्या आहेत. मी कार्यक्रमातून बाहेर पडण्यामागे त्यात आलेले नवीन कलाकार नाहीत. त्यांना कोणताही दोष देऊ नका. मला स्वतःमधील क्षमता आजमावायच्या असल्यानं आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या असल्यानं मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या या प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत.’
साचेबद्ध भूमिका करत राहिल्याने मला त्या भूमिकेचा कंटाळा आला होता. आपण ज्या पठडीतल्या भूमिका करतो, लोक त्याच नजरेतून आपल्याला पाहत असल्याने पुढे चित्रपटातूनही अशाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा मी निर्णय घेतला. कधी कधी वाटायचं की मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलते आहे. कारण आपल्या मिळणाऱ्या मानधनातून आपल्या कुटुंबाचा गाडा चालतो. मग हा निर्णय घेत असताना मला माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा देखील पाठिंबा मिळाला.
आपल्या जवळच्या व्यक्तींकडून एवढा जरी पाठिंबा मिळाला तरी काम करण्याची जिद्द आपसूक निर्माण होते; तसे माझ्याबाबत झाले. आता मी नाटकाच्या निर्मितीकडे वळली आहे.
माझ्या पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मी आणखी एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार; असा ठाम विश्वास मला आहे. हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता.महाराष्ट्राची हास्यजत्राने मला भरभरून दिलं आहे. पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असल्यानेच मीहा शो सोडला. महिन्याकाठी आपल्या हातात मिळणारी एक रक्कम आता यापुढे मिळणार नाही याची जाणीव मला होती. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे मी निर्मिती क्षेत्राकडे वळू शकले, असे विशाखाने म्हटले आहे.